Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: ‘शो’ आणि ‘इव्हेंट’ करणाऱ्या सरकारला अधिवेशनात 'या' मुद्द्यांवर घेरणार...

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव: संयुक्त विरोधी आघाडीचा निर्धार

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao: राज्यातील सरकार हे ‘शो’ आणि ‘इव्हेंट’चे सरकार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंटवर त्यांनी 500 कोटी रुपये पेक्षा जास्त सामान्य माणसांचे पैसे खर्च केले आहेत. यासह अनेक पातळ्यांवर हे सरकार अपयशी ठरले असून या अपयशांचा पाढा आम्ही येत्या विधानसभेत मांडू, असे मत विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले आहे.

संयुक्त विरोधी आघाडीच्या आमदाराशी युरी आलेमाव यांनी सरकारच्या काराभाराबाबत चर्चा केली. विधानसभेत आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.

तत्पूर्वी पावसाळी अधिवेशनाची रणनीती ठरविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्रित येत संयुक्त विरोधी आघाडी एकसंध ठेवण्याच्या निर्धार केला. या विरोधकांनी एकत्रित पत्रकार परिषदही घेतली. यावेळी सातही विरोधी आमदार उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, सरकार गोव्याच्या हिताचे कोणतेच निर्णय घेत नाही. सरकारच्या निर्णयाने सामान्य माणूस पिचत चालला आहे. शेतकरी, शिक्षक, व्यापारी वर्ग सरकारच्या धोरणाला कंटाळा आहे. अधिवेशनात आम्ही या मुद्द्यांवर सरकारला घेरणार आहोत.

म्हादईबाबत सरकार अपयशी

गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी सरकारवर कडाडून टिका केली. ते म्हणाले, सरकार गोवेकरांचे हित साधण्याऐवजी बाहेरील लोकांना आणून इव्हेंट करण्यात मश्गूल आहे. म्हादईबाबत सरकार अपयशी ठरले आहे. याबाबतचे प्रश्न आम्ही विधानसभेत सरकारला विचारणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT