Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: गोवा भाजपची दक्षिण स्वारी; बालाजी पाठोपाठ कार्लुसही भाजपात दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Goa BJP

भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पल्लवी धेंपे यांना दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर दक्षिणेचा किल्ला सर करण्यासाठी भाजपने गांभीर्याने लक्ष पुरवणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे दिवसाआड धेंपे यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी होत आहेत.

सावर्डे मतदारसंघातील मगोचे नेते बालाजी ऊर्फ विनायक गावस यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज वास्कोचे माजी आमदार, काँग्रेसचे नेते कार्लुस आल्मेदा यांनी समर्थक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी अनेक नेते कार्यकर्ते संपर्कात असून येत्या काही दिवसांत ते भाजपमध्ये प्रवेश करतील असे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दक्षिण गोव्यात भाजपकडे कागदोपत्री १५ मंत्री, आमदार दिसत असले, तरी ८ जण नव्याने भाजपमध्ये आले आहेत. ते भाजपमध्ये आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने कार्यकर्त्यांच्या मनोमीलनाचा

प्रश्न होता. तो मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी स्वतः कार्यकर्ता बैठकीत उपस्थित राहून सोडवला आहे. त्या पुढे जात दक्षिण गोव्यातील जास्तीत जास्त नेते, कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्याचे धोरण अवलंबले जाणार आहे. त्याची सुरवात आता केली जाणार आहे. विधानसभेची तीन वर्षांनी होणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय व्यूहरचना आकाराला आणण्यात येत आहे.

भाजपच्या येथील कार्यालयात आज पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्या उपस्थितीत तानावडे यांनी आल्मेदा यांना भाजपमध्ये फेरप्रवेश दिला.

यावेळी त्यांच्यासोबत फेड्रिक हेन्रिक, यतीन कामुलकर, श्रद्धा महाले शेट्ये, नमिता आरोलकर, नारायण बोरकर, मंदा शिरोडकर, धनपाल स्वामी, सुदीप धारगळकर, शलाका कांबळी आदी आजी माजी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांनी आल्मेदा यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला.

..म्हणून कार्लुस भाजपमध्ये

सुडाचे राजकारण न करता आपल्या मतदारसंघातील सगळ्याच प्रभागांत विकासकामे व्हावीत यावर प्रामुख्याने भर देण्याने विरोधी नगरसेवकही आमदार दाजी साळकर यांच्या पूर्ण पाठीशी असल्याचे चित्र अलीकडे दिसू लागले होते.

त्याबरोबरच वास्को मतदारसंघातील पडून राहिलेले अनेक विकास प्रकल्प आता मार्गी लागल्याने लोकांमध्ये साळकर यांची सर्वसमावेशक अशी वेगळीच प्रतिमा तयार झाली आहे. माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांचा

आल्मेदा यांनी भाजप सोडले तरी ते संपर्कात होते. तसेच इतर अनेक नेते पक्षातून गेले तरी ते संपर्कात आहेत आणि ते परत येऊ शकतात. मुरगाव तालुक्यात आता भाजपला प्रतिस्पर्धी राहिला नसून लोकसभा निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळणार आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.

भाजपसोबत अल्पसंख्याक नाहीत असे म्हणणाऱ्यांना आल्मेदा यांचा प्रवेश उत्तर असल्याचे नमूद केले. भाजपशिवाय राज्यात राजकीय पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. विरोधी पक्ष गोंधळला आहे. उमेदवारीसाठी त्यांच्याकडे मारामारी आहे, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.

मगोची नाराजी दूर

वेळ दुपारची, स्थळ बांदोडा येथील ढवळीकर यांचे घर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तेथे येतात आणि अप्रिय विषय समोर येऊन आदळतो, पण मुख्यमंत्री हसत हसत विषय टोलवतात. पुन्हा असे होणे नाही याबाबत मगोच्या नेत्यांना आश्वस्त करतात. मगोचे नेते बालाजी ऊर्फ विनायक गावस यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा संवाद झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT