Goa Population Statistics Dainik Gomantak
गोवा

Goa: गोव्याचा जन्मदर, मृत्यूदर किती आहे? वाचा ताजा अहवाल..

Goa Population Statistics: गोव्याचा एकूण जन्मदर १०.८ (ग्रामीण भागात १०.४, शहरी भागात ११.०) इतका आहे. हा दर देशातील सरासरी १८.४ पेक्षा खूपच कमी आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्याचा एकूण जन्मदर १०.८ (ग्रामीण भागात १०.४, शहरी भागात ११.०) इतका आहे. हा दर देशातील सरासरी १८.४ पेक्षा खूपच कमी आहे. मृत्युदराच्या बाबतीत गोव्याचा आकडा ६.८ प्रतिहजार लोकसंख्या (ग्रामीण ७.१, शहरी ६.७) इतका आहे. हा दर राष्ट्रीय सरासरी ६.४ पेक्षा अधिक असून, लहान राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक आहे.

भारतातील लोकसंख्या आकडेवारीचा ताजा अहवाल (स्टॅटिस्टिकल रिपोर्ट २०२३) नुकताच नोंदणी महानियंत्रक व जनगणना आयुक्तांच्या कार्यालयाने जाहीर केला आहे. या अहवालात गोव्याची लोकसंख्यात्मक वैशिष्ट्ये पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहेत.

देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये गोव्याचा जन्मदर दुसऱ्या क्रमांकाने सर्वात कमी असून, उलट मृत्युदर मात्र लहान राज्यांमध्ये सर्वाधिक नोंदवला गेला आहे. अहवालानुसार, देशात सर्वात कमी जन्मदर अंदमान-निकोबार बेटांचा (१०.१) असून, त्यानंतर गोव्याचा क्रमांक लागतो.

बालआरोग्याच्या बाबतीत मात्र गोव्याची कामगिरी समाधानकारक मानली जाते. २०२१-२३ या कालावधीत गोव्याचा बालमृत्युदर ६ इतका नोंदला गेला आहे. तरीही यात लिंगभेद स्पष्ट दिसतो. मुलींचा मृत्युदर ८, तर मुलांचा मृत्युदर ४ इतका आहे. देशातील सर्वात कमी बालमृत्युदर मणिपूरमध्ये (३) असून, त्यापाठोपाठ लडाख (४), केरळ (५), तर गोवा आणि सिक्कीम (६) या राज्यांचा क्रमांक लागतो.

सखोल अभ्यासाची गरज

जन्मदर कमी असणे व मृत्युदर जास्त असणे या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून गोव्याची लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

राज्यातील आरोग्य सेवा, शहरीकरण, शिक्षण आणि जीवनशैली यामुळे जन्मदरावर परिणाम झाला असला तरी, मृत्युदर वाढण्यामागील कारणांवर सखोल अभ्यासाची गरज असल्याचे सूचित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

India LPG Price Hike: जागतिक स्तरावर इंधनदराचा भडका, पण भारतात सरकारकडून दिलासा; 60 रुपयांच्या एलपीजी दरवाढीमागील खरी मेख काय?

'इराणचे नवे सर्वोच्च नेते जिवंत आहेत, पण...', डोनाल्ड ट्रम्पचा मोठा धमाका; मोजतबा खामेनेईंच्या प्रकृतीबाबत केला धक्कादायक दावा

"इतर राज्‍यांच्‍या तुलनेत गोव्‍याची विकासाच्‍या बाबतीत मोठी भरारी", दामू नाईकांचे प्रतिपादन; पर्वरी उड्डाणपुलाबाबत म्हणाले की.....

SCROLL FOR NEXT