Bicholim Road Closure Dainik Gomantak
गोवा

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Goa market traffic news: सोमवारपासून चतुर्थीच्या पूर्वदिनापर्यंत सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता अन्य कोणत्याही वाहनांना बाजारात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे.

Sameer Panditrao

डिचोली: चतुर्थीच्या बाजारातील गर्दी टाळण्यासाठी सोमवारपासून (ता.२५) दोन दिवस बाजारात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारपासून चतुर्थीच्या पूर्वदिनापर्यंत सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता अन्य कोणत्याही वाहनांना बाजारात प्रवेश करण्यास बंदी असणार आहे. मंगळवारी डिचोली पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष विजयकुमार, मुख्य सचिव नेहाल तळवणेकर, उपनगराध्यक्ष दीपा पळ, अन्य नगरसेवक आदी उपस्थित होते.

चतुर्थी काळात उसळते गर्दी

आधीच बेशिस्त पार्किंगमुळे बऱ्याचदा बाजारात 'ट्रॅफिक जाम'ची समस्या निर्माण होत असते. दरवर्षी चतुर्थी बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळत असते. गणेशभक्त ग्राहकांना सुरळीतपणे बाजार करता यावा आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होता कामा नये.

यासाठी चतुर्थी काळात माटोळीच्या बाजारावेळी बाजारात दुचाकीसह अन्य वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येते. यंदा सोमवारपासून (ता. २५) दोन दिवस बाजाराला जोडलेले सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. फक्त व्यापाऱ्यांची वाहने सकाळी ८ वाजण्यापूर्वी आणि रात्री दहानंतर बाजारात सोडण्यात येणार आहेत. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांसह पालिकेचे कर्मचारीही तैनात असणार आहेत.

बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी चतुर्थीच्या आधी दोन दिवस बाजारात वाहनांना बंदी करण्यात येणार आहे. चतुर्थी बाजारावेळी वाहनांचा आकडा वाढत असतो. त्यामुळे पार्किंग समस्या निर्माण होऊ नये, म्हणून अतिरिक्त जागा पार्किंगसाठी आरक्षित करण्यात येणार आहे. गणेशभक्त ग्राहकांनी शिस्त पाळावी व वाहने व्यवस्थित पार्क करावीत.

- विजयकुमार नाटेकर, नगराध्यक्ष.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Asia Cup 2025: ‘...काही फरक पडत नाही’, भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य; पाहा काय म्हणाले VIDEO

Viral Video: ‘डिग्रीची किंमत घटली...’! फिरायच्या नादापायी केलं ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न; महिलेचा अतरंगी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT