Vice President Election Result: सी पी राधाकृष्णन बनले भारताचे 15वे उपराष्ट्रपती, एनडीएने जिंकली निवडणूक!

CP Radhakrishnan Elected Vice President Of India: भारताच्या लोकशाही परंपरेनुसार देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च संवैधानिक पदासाठी म्हणजेच उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाली आहे.
CP Radhakrishnan Elected Vice President Of India
CP RadhakrishnanDainik Gomantak
Published on
Updated on

CP Radhakrishnan 15th Vice President Of India: भारताच्या लोकशाही परंपरेनुसार देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च संवैधानिक पदासाठी म्हणजेच उपराष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची निवड झाली. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचे उमेदवार जस्टिस बी. सुदर्शन रेड्डी, यांच्यावर मोठा विजय मिळवला. 76 वर्षांचे राधाकृष्णन भारताचे 15 वे उपराष्ट्रपती बनले.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत निकालानुसार, एकूण 767 मतांपैकी राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली, तर सुदर्शन रेड्डी यांना 300 मतांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या मजबूत संख्याबळामुळे राधाकृष्णन यांचा विजय अपेक्षित होता, तरीही मिळालेल्या प्रचंड मताधिक्याने एनडीएची संसदेतील ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली.

निवडणुकीची प्रक्रिया आणि निकालाचे महत्त्व

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक संसद (Parliament) सदस्य करतात, ज्यात लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सदस्य मतदान करतात. एनडीएने आधीच राधाकृष्णन यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केले होते, ज्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता. दोन्ही सभागृहांमध्ये भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांचे असलेले बहुमत त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरले.

या विजयामुळे आता संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यामुळे आता राज्यसभेच्या कामकाजावर सरकारची पकड अधिक मजबूत होईल.

CP Radhakrishnan Elected Vice President Of India
Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

सी. पी. राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

दरम्यान, 67 वर्षीय सी. पी. राधाकृष्णन हे एक अनुभवी राजकारणी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते भारतीय जनता पक्षाशी (BJP) जोडलेले आहेत. भाजपच्या (BJP) तामिळनाडूचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच, कोयंबतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे मानले जाते.

राजकारणाव्यतिरिक्त त्यांनी विविध सार्वजनिक पदांवरही काम केले आहे. अलीकडेच त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते, जिथे त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आणि राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय सहभाग घेतला. राज्यपाल म्हणून मिळालेला अनुभव त्यांना उपराष्ट्रपती म्हणून राज्यसभेचे अध्यक्षपद सांभाळताना नक्कीच उपयुक्त ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

CP Radhakrishnan Elected Vice President Of India
Nagpur-Goa Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाबाबत नवीन अपडेट, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विधिमंडळात काय सांगितलं?

उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी

भारताच्या संविधानानुसार, उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतींनंतर देशाचे दुसरे सर्वोच्च पद आहे. त्यांचे मुख्य कार्य राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणे हे आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे आणि नियमांनुसार कामकाज सुनिश्चित करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल. याशिवाय, राष्ट्रपतींचे पद कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास, उपराष्ट्रपती तात्पुरत्या स्वरुपात राष्ट्रपती म्हणून कार्य करतात.

राधाकृष्णन यांची निवड हे एनडीए सरकारसाठी एक मोठे यश आहे. एकाच वेळी देशाच्या दोन सर्वोच्च पदांवर आपला उमेदवार बसवण्याची रणनीती यशस्वी झाल्याने सरकारचा आत्मविश्वास वाढला आहे. येणाऱ्या काळात सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची भूमिका कशी पार पाडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यांची नियुक्ती देशाच्या राजकीय पटलावर एक महत्त्वाचा बदल घडवून आणणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com