
Azmatullah Omarzai Record: आशिया कप 2025 चा पहिलाच सामना रोमांचक ठरला. अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील या सामन्याने क्रिकेटप्रेमींना सुरुवातीलाच पुरेपूर मनोरंजनाचा अनुभव दिला. एका बाजूला अफगाणिस्तानचा सलामीवीर सादिकुल्ला अटल याने अप्रतिम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली, तर दुसऱ्या बाजूने खालच्या फळीतील फलंदाज अजमतुल्ला ओमरझाई याने वादळी खेळी करत सर्वांची मने जिंकली. त्याने आपल्याच संघाचा माजी कर्णधार मोहम्मद नबी याचा सुमारे आठ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.
दरम्यान, या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघासाठी सलामीवीर सादिकुल्ला अटलने उत्कृष्ट खेळी केली. त्याने केवळ 52 चेंडूंमध्ये 73 धावांची दमदार खेळी साकारली. या खेळीत त्याने तीन उत्तुंग षटकार आणि सहा चौकार मारले. अटलने संघाला चांगली सुरुवात करुन दिली, पण त्यानंतर मैदानात उतरलेल्या अजमतुल्ला ओमरझाईने तर कमालच केली. त्याने केवळ 20 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, मोहम्मद नबी त्या वेळी स्वतः मैदानात उपस्थित असतानाच त्याचा हा विक्रम मोडला गेला.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम याआधी मोहम्मद नबीच्या नावावर होता. त्याने 2017 मध्ये आयर्लंडविरुद्ध 21 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर 2024 मध्ये आणखी एक अफगाणी फलंदाज गुलाबदीन नाईब यानेही भारताच्या विरोधात 21 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून नबीच्या विक्रमाची बरोबरी केली होती. परंतु, आता अजमतुल्ला ओमरझाईने केवळ 20 चेंडूंत अर्धशतक ठोकून या दोन्ही अनुभवी फलंदाजांना एकाच फटक्यात मागे टाकले आणि अव्वल स्थान पटकावले.
या विक्रमाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे, अजमतुल्ला ओमरझाईचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलेच अर्धशतक आहे. पहिल्याच अर्धशतकात विक्रम करण्याची ही दुर्मिळ कामगिरी त्याने केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.