Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Ganesh Chaturthi: गणेशोत्‍सवाला भावनिक किनार आहे, तेवढाच सामाजिक पातळीवर आर्थिक उलाढालीचा उत्‍सव म्‍हणून तो प्रसिद्ध आहे. सिंधुसागराच्या कुशीत वसलेल्या गोव्यात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो.
Ganesh Chaturthi
Goa GaneshotsavDainik Gomantak
Published on
Updated on

गणेशोत्‍सवाला भावनिक किनार आहे, तेवढाच सामाजिक पातळीवर आर्थिक उलाढालीचा उत्‍सव म्‍हणून तो प्रसिद्ध आहे. सिंधुसागराच्या कुशीत वसलेल्या गोव्यात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. परंपरेनुसार पूजाविधी करणारी अनेक कुटुंबे, सार्वजनिक मंडळे गोव्यातील गणेशोत्सव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतात.

घुमटाच्या कडक तथापि मधूर आवाजात इथल्या गणेशाची होणारी आरती एका वेगळ्याच सुरात म्हटली जाते. दोन्ही बाजूंनी उघडे असलेल्या मातीच्या घड्याला एका बाजूने घोरपडीचे चर्म लावून बंद करतात. यावर दिलेला ठेक्याचा सूर अगदी दूरपर्यंत ऐकू येतो. अवघा परिसर या आवाजाने भक्तिरसात न्हाऊन निघतो.

Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi: 'तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता'! आगमनाची तयारी सुरु; माटोळी, वाद्ये, नैवेद्यासाठी बाजारात गर्दी

त्यामुळे गोमंतकीय गणेशोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य अशी ओळखही घुमट वादनास मिळाली आहे. अनेक ठिकाणी घुमट वादन स्पर्धाही यानिमित्ताने आयोजित केल्या जातात. गणेशोत्‍सव काळात घुमटांना मोठी मागणी असते. गोव्‍यात आता दुकाने सजू लागली आहेत. मोठ्या उलाढालीची आशा आहे. दरम्‍यान, गोव्यात काही जुनी गणेशमंदिरेही इथल्या गाणपत्य आराधनेची साक्ष देत आहेत.

एकेकाळी दीपवती नावाने ओळखले जाणारे मांडवीच्या काठी वसलेल्या दिवाडी बेटातील नावेली गावात गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर वसले होते. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगीजांच्या धार्मिक छळवणुकीमुळे भाविकांनी या दैवताचे प्रारंभी स्थलांतर अंत्रूज महालातील खांडेपार गावात आणि त्यानंतर सध्याच्या ठिकाणी खांडोळा येथे केले होते, अशी माहिती मिळते. खांडोळा येथे असलेले हे महागणपतीचे संस्थान गणेश पूजनाच्या शतकोत्तर वर्षांच्या इतिहासाच्या परंपरेची साक्ष देते, असे म्हटले जाते.

Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2025: '40 वर्षांची' परंपरा, 2 महिने गाव सोडून करतात गणेशभक्तांची सेवा; पेडण्यात होते चर्मवाद्यांची दुरुस्‍ती

डिचोलीत कूंदनपूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या कुडण्यात द्विहस्त गणेशमूर्ती शेकडो वर्षांच्या इतिहासाचा वारसा सांगणारी प्राचीन मूर्ती आहे. सांगे कुर्डीतील, त्याचप्रमाणे पिलार सेमिनारीच्या वस्तू संग्रहालयातील गणेश मूर्ती शेकडो वर्षांपासून प्रचलित असलेल्या गणेश मूर्ती पूजनाच्या प्राचीन परंपरेची प्रचिती आणून देते. सांग्यातील विचुंद्रे, पेडण्यातील कोरगाव, केप्यातील चंद्रेश्वर आणि फोंड्यातील शिरोडा येथे चतुर्हस्त गणपतीच्या मूर्ती आढळलेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com