Bison Sighting Goa Dainik Gomantak
गोवा

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Bicholom Lakhere Bisons: रात्रीच्यावेळी ही श्वापदे लोकवस्तीजवळ फिरतात, त्यामुळे स्थानिक भयभीत झाले आहेत. ही जनावरे परिसरातील बागायती पिकांची नासधूस करीत आहेत.

Sameer Panditrao

डिचोली: येथील लाखेरे भागात लोकवस्तीजवळ रानटी श्वापदांचा संचार वाढला असून गव्यांसह रानडुकरांचाही धुमाकूळ सुरू आहे. रात्रीच्यावेळी ही श्वापदे लोकवस्तीजवळ फिरतात, त्यामुळे स्थानिक भयभीत झाले आहेत. ही जनावरे परिसरातील बागायती पिकांची नासधूस करीत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांपूर्वीपासून लोकवस्तीजवळ कळपाने गवे संचार करीत आहेत. आता रानडुकरांनी लोकवस्तीजवळ मोर्चा वळविल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

गव्यांसह रानडुकरांच्या दहशतीमुळे लोक रात्रीच्यावेळी घराबाहेर पडण्याचे धाडस करीत नाहीत. वन खात्याने या श्वापदांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. खाद्याच्या शोधात ही जनावरे लोकवस्तीत घुसत आहेत, असा दावा प्राणिमित्रांकडून करण्यात येत आहे.

माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता

रात्रीच्यावेळी गव्यांसह रानडुकरे बागायतीतीत घुसतात. लाखेरे येथील एक बागायतदार आनंद मांद्रेकर यांच्या बागायतीत गवे आणि रानडुकरांच्या पावलांच्या खुणाही उमटल्याचे आढळून येत आहेत. गव्यांसह रानडुकरांकडून त्यांच्या बागायतीतील केळी, सुरण आदी पिकाची नासधूस केली आहे. ही रानटी श्वापदे अचानक समोर आली तर माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बागायती पिकांची नासाडी रोखण्यासाठी आणि अनर्थ टाळण्यासाठी वन खात्याने या रानटी श्वापदांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मांद्रेकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT