Bison In Ponda
Bison In PondaDainik Gomantak

Bison In Ponda: बोणबाग- बेतोडामध्ये भरवस्तीत गवा रेड्यांचा मोकाट वावर, परिसरात भीतीचं वातावरण Watch Video

Bison In Goa: बोणबाग- बेतोडा परिसरात गव्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on

फोंडा : बोणबाग- बेतोडा परिसरात गव्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (११ ऑगस्ट) पहाटे शांताराम गावडे यांच्या घराजवळ तब्बल सहा गवे दिसून आले. ही घटना पाहताच ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात याच परिसरात गव्याच्या हल्ल्यात मंगला शांताराम गावडे या महिलेला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अजूनही त्या घटनेची धास्ती लोकांच्या मनात ताजी असून, सोमवारी पुन्हा गव्यांचा वावर दिसल्याने भीती अधिकच वाढली आहे.

Bison In Ponda
Goa Crime: मोटरसायकलवरून आले, मंगळसूत्र खेचून पळाले; दागिने पुण्यात जप्त, 8 महिन्यांनंतर दोघा चोरट्यांना अटक

गवे शेतीचेही मोठे नुकसान करतात. भात, भाजीपाला, आणि फळबागांची हानी करून ते शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करतात. याशिवाय, या भागात अनेकदा बिबट्यांचाही वावर दिसतो, ज्यामुळे जंगलातील वन्यजीवांचं लोकवस्तीत स्थलांतर वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

Bison In Ponda
Goa Land Transfer: परप्रांतीय शेतकऱ्यांना जमिनी विकण्‍यासाठी 60 जण तयार, सरकारकडून 4अर्जांना मान्‍यता

वनविभागाकडून गव्यांचा वावर रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याने लोकांमध्ये असंतोष आहे. ग्रामस्थांनी लवकरात लवकर गवे हुसकावण्यासाठी आणि शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com