Goa: श्री ईस्वटी ब्राम्हण लक्ष्मीनारायण देवस्थानातर्फे बांधण्यात येणाऱ्या नवीन रंगमंचाचे भूमीपूजन (Bhumipujan of the theater) आज सकाळी दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर स्थानिक आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Urban Development Minister Milind Naik) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मुरगाव नगरपालिका (Mormugao Municipality) नगराध्यक्ष दामोदर कासकर,नगरसेवक दया नाईक, माजी नगरसेवक शशिकांत परब,मुरारी बांदेकर, कृष्णा तोरसकर,मंदिर समिती अध्यक्ष प्रेमानंद केरकर, सचिव सुवर्ण परब, खजिनदार सूरज घोणसेकर, सुदन रेडकर, संदीप पालेकर देवालयाचे महाजन ,स्थानिक रहिवासी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोडीत काढलेल्या पूर्वीच्या जुन्या रंगमंचाच्या जागी नवीन रंगमंच उभारण्यात येणार आहे.
दरम्यान संध्याकाळी सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याचा कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात झाला. तदनंतर रात्री मंदिरा परिसरातून पालखी मिरवणूक - श्री दयानंद लक्ष्मण केरकर व कुटुंबीय यांच्या यजमानपदाखाली विविध धार्मिक विधी नुसार काढण्यात आली. नंतर आरती व तीर्थप्रसादाच्या कार्यक्रमाने संपूर्ण दिवसाच्या उत्सवाची सांगता करण्यात आली.समस्त महाजन व भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
दरम्यान 'दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा म्हणत' आज दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याच्या पानांचे वाटप करुन दसरोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. आज सकाळपासून वास्को शहरात प्रत्येक मंदिरात, घराघरात झेंडूच्या फुलांची माळ बांधून पूजा अर्चा करण्यात आली.तसेच शस्त्रांची पूजा करण्यात आली. यंदा कोरोना महामारी मुळे साधेपणाने पण भक्तीमय वातावरणात दसरोत्सव साजरा करण्यात आला.सगळीकडे वातावरण भक्तीमय बनले होते. लोकांनी सणांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन वाहन, सुवर्णालंकार, वास्तू,नवीन कपडे खरेदी केले.
आजच्या दिवशी घरात गोडपदार्थ बनविण्याची परंपरा आहे. कुणी मुगाचे गोडसे हा पदार्थ बनवितात तर कुणी चणाडाळीपासून उबनणारे मणगणे हा पदार्थ बनवितात. या व्यतिरिक्त आजच्या दिवशी वाहनचालक वाहने पाण्याने स्वच्छ करून वाहनांची पुजा करण्यात आली. वाहनचालकांनी झेंडू फुलांची माळ आपल्या गाडीला घातली. फळे, पेढे,लाडू आदी जिन्नस खरेदी केले.बाजारात आपट्याची पाने विक्रीस उपलब्ध झाली होती. ही पाने विकत घेऊन दसरा सण साजरा करण्यात आला.पालख्या सीमोल्लंघन करणार असल्याने पालखीत घालण्यासाठी लागणारे रंगीत
कापड / साहित्य खरेदी करण्यात आले. या दिवशी कीर्तन कार्यक्रमासाठी राज्यातील व परराज्यातील कीर्तनकार आरक्षित करण्यात आले होते.त्यानुसार किर्तनाचे कार्यक्रम रंगले.संध्याकाळच्या सत्रात सोने लुटण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.या कार्यक्रमानंतर आरती, सामूहिक गा-हाणे, तीर्थप्रसाद झाल्यानंतर संपूर्ण दिवसाच्या उत्सवाची सांगता करण्यात आली.काही मंदिरात रात्री पालखी सोहळा संपन्न झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.