Goa: 2022 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election 2022) जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे, गोव्यात बरेच राजकीय पक्ष आपली ताकद आजमावण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. त्याचप्रमाणे सध्या सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमांतर्गत लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे, सध्या गोव्यात चर्चेचा विषय ठरलेला गोवा सरकारचा 'सरकार तुमच्या दारी' या तालुका स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, या कार्यक्रमाद्वारे गोव्याची जनता आमच्याशी जोडली जात आहेत तसेच या कार्यक्रमाद्वारे लोकांच्या समस्या सरकारद्वारा सोडवल्या जात आहेत, असे मुख्यमंत्री एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
आपण मागच्या तीन वर्षांच्या केलेल्या कामाविषयी लोकांना चांगलेच ठाऊक असून येत्या काळात लोकांपर्यंत केलेली कामे घेऊन जाणार आहे. त्यात मग कोविड महामारीच्या काळात केलेले काम असो किंवा पावसामुळे झालेल्या पूर स्थितीत केलेलं काम किंवा चक्रीवादळावेळी केलेल काम असो. पायाभूत सुविधा तसेच मनुष्य विकासासारखी काम येत्या 19 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. येत्या काळात मनुष्य विकास व 'स्वयंपूर्ण गोयं' आणि मोदींनी दिलेला 'आत्मनिर्भर भारत' हा नारा घेऊन लोकांपर्यंत जाऊन जनतेचा विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ सावंत म्हणाले.
2022 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल का, या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येक निवडणूक ही वेगळे आव्हान घेऊन येत असते, व हे आव्हान पेलण्यात 'भारतीय जनता पक्ष' आतापर्यंत बऱ्यापैकी यशस्वी ठरलेली असून. येत्या निवडणुकीत सुद्धा गोव्याच्या जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्ष विजयश्री खेचून आणेल. मागच्या निवडणुकीच्या मानाने येत्या विधानसभेत अनेक पक्ष गोव्यात निवडणूक लढावत असून हे सर्व पक्ष एका बाजूला आहेत व भारतीय जनता पक्ष एका बाजूला आहे. हे नेहमीचेच समीकरण देशात भाजप चे सरकार आल्यापससुन राहिलेले आहे, परंतु पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आतापर्यंत आम्ही जिंकत आलेलो आहोत व येत्या काळात सुद्धा भाजप जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्याक केला.
आम आदमी पार्टी विषयी विचारले असता डॉ. सावंत म्हणाले, गोव्यात खोटारडेपणा चालत नाही, गोव्यातील लोकांना जॉब देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिल्यावर त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, अगोदर दिल्लीतील लोकांना जॉब दयावेत, मग गोव्यावर लक्ष द्या, असा टोला केजरीवालांना लगावला. युतीविषयी सावंत यांना विचारले असता, सध्यातरी असा कोणताही विचार नाहीये, गरज पडल्यास येत्या काळात त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, कॉंग्रेस मधून आलेल्या 10 आमदारांविषयी विचारले असता ते काँग्रेसला कंटाळून आलेले होते व त्यांना सामजून चूकले होते की, देशात व गोव्यात केवळ भाजपचे सरकारच विकास घाडवून आणू शकतो, त्यामुळे ते 10 आमदार भाजपशी जोडले गेले असे सावंत यांनी सांगितले. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना तिकीट मिळणार कि नाही या विषयी सर्व एकही केंद्रातून ठरवले जाईल, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
सद्या गोव्यात 10,000 सरकारी नोकऱ्यांमधील 8,000 नोकरीची जाहिरात झाली असून, येत्या काळात उरलेल्या २००० नोकऱ्यांची जाहिरात प्रसिद्ध होईल व 19 डिसेंबर पूर्वी सर्व नोकऱ्या भारल्या जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, त्याशिवाय प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा उरलेल्या लोकांना कसे जॉब मिळतील यावर प्रक्रिया चालू असल्याचे त्यानणे सांगितले.
नॅशनल स्कूल ऑफ लॉं सारख्या शिक्षण संस्था गोव्यात येवू लागल्या आहेत त्याचा फायदा गोव्यातील युवकांना होणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी आवर्जून सांगितले. कोविद काळात राजस्व खूप खर्च केले गेलं, परंतु केंद्र शासनाकडून योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे गोवा राज्य सरकारचा आर्थिक ताण कमी झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोविद काळात सरकारवर आरोप प्रत्यारोप झाले असले तरी आम्ही राज्याच्या मेडिकल टीम सोबत काम चांगले काम झाले आहे, गोवा मेडिकल टीमने देखील चांगले काम केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोधी पक्ष करत असलेल्या आरोपांवर बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, मी लोकांसोबत कसे काम करतो, किती काम करतो, हे लोकांना चांगले माहित आहे. त्यामुळे मला कोणाला त्याविषयी विशेष सांगायची गरज पडणार नाही, भाजप सरकारने कसे काम केले आहे, ते लोकांना माहित आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी देवेन्द्र फडणवीस सोबत आम्ही चांगले काम करू, तसेच त्यांच्या जवळ असलेल्या संघटन कौशल्याचा आम्ही नक्कीच फायदा करून घेऊ व गोव्यात विधानसभेसाठी आमचे ''मिशन २२ मध्ये २२ प्लस'' साध्य करू असा विश्वास व्यक्त केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी विधानसभेची रणनीती जाहीर केल्यानंतर आम्ही लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे लोकांचा भाजपाला जनतेचा खूप चांगलं प्रतिसाद मिळत आहे व आमचा 'स्वयंपूर्ण गोवा' हा नारा घेऊन लोकांपर्यंत जात असून त्यात लोकांचा चूप चांगला प्रतिसाद मिळत आहे, व येत्या काळात स्वयंपूर्ण गोवा चा फायदा लोकांना झालेला दिसून येईल. असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.