parye sattari Dainik Gomantak
गोवा

Goa: पर्ये सत्तरीत जलकुंभाचे भूमीपूजन

पर्ये सत्तरी ( parye sattari) येथे जलकुंभाचे ( drinking water reserviour) भूमीपूजन आज आरोग्य मंत्री विश्वजीत राणे ( health minister vishwajeet rane) यांच्या हस्ते झाले.

Manish Jadhav

पर्ये सत्तरी ( parye sattari) येथे जलकुंभाचे ( drinking water reserviour) भूमीपूजन आज आरोग्य मंत्री विश्वजीत राणे ( health minister vishwajeet rane) यांच्या हस्ते झाले. यावेळी होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, पर्ये ग्रामपंचायत सरपंच सका सावंत व पंचायतीचे इतर पंच सदस्य उपस्थित होते. पर्ये वासीयांना सतत 24 तास पिण्याच्या पाणी पुरवठा व्हावा या हेतूने पर्ये माजीकवाडा व घोलवाडा अशा दोन ठिकाणी जलकुंभ उभारले जाईल व त्याव्दारे पर्येतील ग्रामस्थांना यातून पाणी पुरवठा केला जाईल.

तसेच या प्रकल्पामुळे पर्येतील घोलवाडा व सावंतवाडा या भागात पाण्याची समस्या होती. ती समस्याही यानंतर दूर होईल. या प्रकल्पासाठी 5.5 कोटी रुपये खर्च केला जाईल. गेले अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची आवश्यकता होती ती आता पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प अस्तित्वात येण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांचे सहकार्य लाभल्याचे विश्वजीत राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT