Goa: गोव्यात आज रेड अलर्ट

अतिवृष्टीची शक्यता (heavy rain) : समुद्रालाही उधाण ( sea overflowing)
The bridge in Goa was submerged due to floods
The bridge in Goa was submerged due to floods dainik Goamantak
Published on
Updated on

पणजी : गेल्या सात दिवसांपासून सततच्या कोसळधारांमुळे गोमंतकीय पुरते बेहाल झाले (heavy rain) असतानाच रविवारी (ता.१८) राज्यात (Goa state) हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिला आहे. (red alart) वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे. (metrological alart) वेंगुर्ला ते वास्कोपर्यंतचा समुद्र किनारा खवळलेला असेल. (vengurla to vasco) त्यामुळे दक्षतेचे आवाहन करण्यात आले आहे. मागील रविवारपासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या सात दिवसांत राज्यात तब्बल ६२६.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. शनिवारीही पावसाचा जोर कायम राहिला आणि ६९.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस गेल्या आठवड्यात झाला. रविवारी राज्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्याशिवाय प्रतितास ५० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहणार आहे. तसेच समुद्रही खवळलेला असेल. वेंगुर्ला ते वास्कोपर्यंतच्या किनारपट्टीपर्यंत ३.५ ते ४.१ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २१ पासून राज्याला पावसापासून दिलासा मिळणार असल्‍याचे वेधशाळेने म्हटले आहे. आठवडाभरात राज्यात सरासरीपेक्षा १७ टक्क्यांनी पाऊस वाढला असून आतापर्यंत १७४०.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. (Goa)

The bridge in Goa was submerged due to floods
Goa: नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क केल्याने मडगावात होते वाहतुकीची कोंडी

गतवर्षी १८ जुलै रोजी राज्यात अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी ९२.६ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती. रविवारीही हा योगायोग साधणार का? हे पाहावे लागेल. यंदा राज्यात सर्वाधिक पाऊस पेडणे तालुक्यात (२४९२.१ मि.मी.) तर सर्वात नीचांकी नोंद मडगाव (१३९४.९ मि.मी.) येथे झाली आहे. शनिवारचा पाऊस : म्हापसा- ५५.०, जुने गोवे-८६.०, पेडणे-४५.८, काणकोण-६२.५, मुरगाव-११०.६, पणजी- ९५.१. मान्सून सुरू झाल्यापासून अवघ्या दीड महिन्यात राज्यातील चार धरणे तुडुंब भरली आहेत. त्यात साळावली, गावणे, पंचवाडी आणि आमठाणे धरणांचा समावेश आहे. तिराळी ८६ तर अंजुणे धरण ६१ टक्के भरले आहे.

The bridge in Goa was submerged due to floods
Goa : पत्रादेवी अबकारी विभागाने पाच लाखाची दारू जप्त केली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com