Bhoma Road Expansion Dainik Gomantak
गोवा

Bhoma Road Expansion: आंदोलन होणारच! बगलमार्गप्रश्नी भोमवासीय आक्रमक

आरजीचे आमदार, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई अन्य नेत्यांनी या ठिकाणी येऊन लोकांना पाठिंबा दर्शविला आहे.

Ganeshprasad Gogate

Bhoma Road Expansion भोमा गावातून राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात ग्रामस्थांचा पूर्वीपासून विरोध आहे. त्यासाठी स्थानिक लोक सरकारकडे बगलमार्गाची मागणी करीत आहेत. गेल्या एक वर्षापासून स्थानिक लोक सरकारविरुद्ध लढा देत आहेत. परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने ग्रामस्थांनी सध्या आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी ग्रामस्थांनी अनेक बैठका घेऊन विविध संस्थेचा पाठिंबा घेतलेला आहे. यापूर्वी आरजीचे आमदार, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई अन्य नेत्यांनी या ठिकाणी येऊन लोकांना पाठिंबा दर्शविला आहे. आता अन्य नेतेही रविवार 15 रोजी होणाऱ्या सभेत उपस्थित राहणार असल्याने आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

भोम येथील ग्रामस्थ संजय नाईक अधिक माहिती देताना म्हणाले, ''केंद्र सरकारची लॉबी करणारे राज्य सरकार जनतेच्या विरोधात जाऊन प्रकल्प राबविण्यात अधिक महत्त्व देत आहे. भोमवासीयांचा जागृत देवस्थानावर विश्वास असून बगल रस्त्यासाठी पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र करून यश मिळविण्यासाठी रविवारी गाऱ्हाणे घालण्यात आले आहे, बगलरस्त्यासाठी ग्रामस्थ माघार घेणार नसून १५ रोजी तीव्र आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल'', असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT