Pernem Zoning Plan: महत्वाची बातमी! जमीन रूपांतर आराखड्याच्या सूचना- हरकतींसाठी मुदत वाढवली

नगरनियोजन आणि शहरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी यासंबंधी माहिती दिलीय.
TCP Minister Vishwajit Rane
TCP Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

Pernem Zoning Plan: सध्या राज्यभरात पेडणे जमीन रूपांतर आराखडा प्रकरणाची चर्चा सुरु असून या संबंधी एक महत्वाची अपडेट हाती येतेय. ''विकासापासून दूर असलेल्या पेडणे तालुक्याचा जमीन रूपांतर आराखडा (झोनिंग प्लॅन) 20 वर्षांनंतर खुला करण्यात आला आहे.

त्याचा मसुदा प्रत्येक पंचायतींना पाठवण्यात आला असून यावर नागरिकांनी सूचना, हरकती मांडाव्यात'', असे नगरनियोजन आणि शहरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले होते.

या जमीन रूपांतर आराखडा म्हणजेच झोनिंग प्लॅन संबंधित पंचायतींकडून सूचना आणि हरकती सादर करण्याची अंतिम मुदत 30 दिवसांनी वाढवण्यात आली आहे.

सर्वांना विश्वासात घेऊनच तो अधिसूचित करण्यात येईल. मात्र, तो कोणत्याही स्थितीत पेडणे झोनिंग प्लॅन माघारी अथवा रद्द केला जाणार नाही, असे ठाम मत देखील राणे यांनी मांडले होते.

तसेच यापूर्वीच प्राप्त झालेल्या सूचना/आक्षेपांची छाननी करणे आवश्यक असून या प्रक्रियेत मदत करण्यासाठी केंद्रातील सचिव स्तरातील अधिकारी सहभागी होणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.

TCP Minister Vishwajit Rane
Benaulim Accident: वार्का बाणावली येथे भरधाव पिकअप फार्मसीमध्ये घुसली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com