Nadbramh Sanstha Singing Bhajan Program at Bhausaheb Bandodkar Samadhi Place (Goa)
Nadbramh Sanstha Singing Bhajan Program at Bhausaheb Bandodkar Samadhi Place (Goa) Pradip Naik / Dainik Gomantak
गोवा

Goa: भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नादब्रह्म संस्थेतर्फे भजनाचा कार्यक्रम

Dainik Gomantak

वास्कोतील (Vasco) नादब्रह्म संस्थेतर्फे (Nadbramh Sanstha) गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त (Bhausaheb Bandodkar Death Anniversary) मिरामार (Miramar - Panaji) येथील त्यांच्या समाधीस्थळी (Samadhi Place) भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची आज पुण्यतिथी विविध ठिकाणी साजरी करण्यात आली व त्यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान त्यांच्या समाधीस्थळी विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली व समाधीवर पुष्प अर्पण करून सर्वांनी बांदोडकर यांना अभिवादन केले. दरम्यान यावेळी वास्कोतील नादब्रह्म संस्थेचा भजनाचा कार्यक्रम (Bhajan Program) आयोजित करण्यात आला होता. (Goa)

गेली ४० वर्षे वास्कोतील नादब्रह्म ही संस्था मिरामर येथील स्व.भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीस्थळी भजन सादर करीत आहे.आजही पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष आनंद सातोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील प्रसिद्ध गायक कलाकार प्रेमानंद वेळूस्कर, तसेच शिल्पा मंदार नाईक, सिद्धेश कामत, ईश्वर कुंटोजी, प्रदीप नाईक यांनी भजन सादर केले. त्यांना दिलीप नाईक (हार्मोनियम), आनंद सातोस्कर (तबला) तसेच रोहन चोडणकर, सोहम होलकर यांनी साथ संगत केली. सुमारे दीड तास झालेल्या भजनाच्या कार्यक्रमात विविध अभंग सादर करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT