Birsa Munda Dainik Gomantak
गोवा

Birsa Munda Statue at Goa: परशुरामानंतर आता राज्यात उभारणार बिरसा मुंडा यांचा पुतळा- सावंत

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : आदिवासी नेत्यांनी राष्ट्रपतींना केलेली विनंती तत्काळ केली मान्य

गोमन्तक डिजिटल टीम

Birsa Munda Statue at Goa राज्य सरकारने भगवान परशुराम यांचा पुतळा कांपाल येथे उभारून गोवा ही परशुराम भूमी आहे, यावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले होते. मात्र, हे राज्य आम्ही वसवले, असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे.

त्यांचा अस्मिताबिंदू असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा राज्यात उभा राहिला तर गोवा ही आदिवासींचीही भूमी आहे, हेही मान्य केल्यासारखे होणार आहे.

त्यासाठी आदिवासी नेत्यांनी आज खुबीने राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत ही मागणी पोचवली आणि पुतळा उभारण्याचे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या तोंडून मिळवले. अर्थात, राष्ट्रपतींनीच तशी सूचना मुख्यमंत्र्यांना केली.

राजभवनच्या दरबार सभागृहात राष्ट्रपतींची आज विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. प्रत्येक गटासाठी केवळ दोन मिनिटांचा कालावधी दिला होता.

याचदरम्यान डॉ. मधु घोडकिरेकर यांनी आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा गोव्यात उभारावा, अशी मागणी पुढे केली.

राज्यात आदिवासी दिन व बिरसा मुंडा जयंती सरकारी पातळीवर साजरी केली जाते, याकडेही लक्ष वेधताना त्यांनी सरकारचे आभार मानले.

राष्‍ट्रपतींना त्या पुतळ्याच्या उद्‍घाटनासाठी बोलावण्याची संधी आम्हाला मिळेल, असे सांगताच राष्ट्रपतींनी तसा पुतळा सरकारने उभारावा, अशी सूचना केली आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला संमती दिली.

आरक्षणाला भावनिक किनार

राजकीय आरक्षणासाठी त्यांनी कामावरून थकून-दमून आलेल्या आईचे उदाहरण दिले. ते म्हणाले, आई कामावरून परत आली की घरातील लहानग्यांच्या अनेक तक्रारी, मागण्या असतात.

आमचीही अवस्था त्याच मुलासारखी आहे. आम्ही आमच्या मागण्या लेखी स्वरूपात दिल्या आहेत, त्यात राजकीय आरक्षणाचाही समावेश आहे. ती मागणी आईने नाही तर मामाने (मुख्यमंत्री हे राष्ट्रपतींचे छोटे बंधू, या नात्याने) पूर्ण केली तरी पुरे, असे ते सहजपणे म्हणाले.

...अखेर एसटी आरक्षणाचा विषय मांडलाच

यावेळी आदिवासींसाठी राजकीय आरक्षणाचा विषय राष्ट्रपतींसमोर कोणी काढू नये, यासाठी फिल्डींग लावली होती.

तरीही डॉ. मधु घोडकिरेकर यांनी तो विषय खुबीने काढलाच. त्यांनी अक्कल हुशारीने दोन मिनिटांचा पुरेपूर वापर केला.

त्यांनी सुरवातीलाच राष्ट्रपती शपथबद्ध झाल्या, तेव्हा त्यांनी ‘नमस्कार’ ऐवजी ‘जोहार’ असा शब्दप्रयोग केला होता, त्याचा धागा पकडून विषयाची मांडणी केली. त्यांनी राजकीय आरक्षणाचा विषयही हळूच काढला.

धनगर समाजानेही मांडली व्यथा :

या बैठकीवेळी ॲड. विद्या गावकर, असुसीयाना यांनी आदिवासींंचे म्हणणे मांडले. थोकू कवळेकर यांनी धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली.

यावेळी आदिवासी नेत्यांच्या मांडणीने प्रभावित झालेल्या राष्ट्रपतींनी ओडिशातून आलेल्या आदिवासी नेत्यांना शाल भेट दिली.

उंचीवरही चर्चा

भगवान परशुराम यांचा कांपाल येथील पुतळा ३० फूट उंचीचा आहे. त्यापेक्षा कमी उंचीचा पुतळा भगवान बिरसा मुंडा यांचा नको, अशी आदिवासी नेत्यांची भावना आहे.

त्यामुळे पुतळा उभारण्याचे मान्य झाल्यावर डॉ. मधु घोडकिरेकर यांनी पुतळ्याच्या उंचीचे तेवढे पहा, अशी सूचना जाता जाता केली.

उंचीचा विषय कोणत्या संदर्भाने आला, हे राष्ट्रपतींच्या लक्षात आले नसले तरी मुख्यमंत्र्यांनी मान डोलावून तो विषय समजला, असे संकेत दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT