Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यात पावसाळी पर्यटनासाठी Beyond Beaches मोहिम! सण, संस्कृतीवर भर; प्रचारासाठी सोशल मीडिया मोहीम

Rohan Khaunte: गोव्याच्या विविध पर्यटन पैलूंवर आधारित २० आठवड्यांची सोशल मीडिया मोहीम राबवली जाणार असून, एकसंध प्रचारासाठी ‘हॅशटॅग’ वापरण्यावर भर देण्यात आला आहे.

Sameer Panditrao

पणजी: पावसाळी पर्यटनासाठी सरकारने ‘गोवा बियॉन्ड बीचेस’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून या मोहिमेत सांजाव, चिखलकाला, यांसारखे पारंपरिक सण, स्थानिक संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य प्रदर्शित करण्याचा समावेश आहे.

पावसाळा आता ‘ऑफ-सीझन’ राहिलेला नाही, त्यामुळे सोलो ट्रॅव्हलर्स, महिला प्रवासी, विद्यार्थी, अशा सर्वांना आकर्षित करण्यासाठी दर्जेदार अनुभव आणि सवलतीचे पॅकेज देण्यावर भर द्यावा, असे आवाहन पर्यटन व्यवसायाशी निगडीत घटकांना मंत्री रोहन खंवटे यांनी केले.

पर्यटन मंत्री खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली गोवा पर्यटन विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पर्यटन संचालक केदार नाईक (ऑनलाइन), जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, टीटीएजी अध्यक्ष जॅक सुखीजा, ऑनलाईन ट्रॅव्हल पार्टनर्स, हॉटेल व्यावसायिक, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आणि इतर महत्त्वाचे अधिकारी सहभागी झाले होते.

सोमवारी पर्यटन धोरणाबाबत सत्र

दुबईसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांकडे लक्ष केंद्रित करून, एअरलाईन-हॉटेल संयुक्त पॅकेजेस, तसेच चुकीच्या प्रचाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची घोषणाही मंत्री खंवटे यांनी केली. येत्या आठवड्यात हॉटेल व्यावसायिक, एअरलाईन्स व ओटीए प्रतिनिधींची अंतिम मोहीम ठरवण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार असून, पुढील सोमवारी पर्यटन धोरणाबाबत स्वतंत्र सत्र होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडिया मोहीम

बैठकीत आगामी पावसाळी पर्यटन हंगामासाठी व्यापक प्रचार व जनसंपर्क धोरण आखण्यात आले. गोव्याच्या विविध पर्यटन पैलूंवर आधारित २० आठवड्यांची सोशल मीडिया मोहीम राबवली जाणार असून, एकसंध प्रचारासाठी ‘हॅशटॅग’ वापरण्यावर भर देण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिकांना या मोहिमेशी सुसंगत अशा स्वरुपाच्या सवलतीचे पॅकेजेस सादर करण्याचे आवाहन देखील बैठकीतून भागधारकांना करण्यात आले. यावेळी पर्यटन व्यवसायाशी निगडीत घटक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Goa Live News: साखळी येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT