Goa Bench  Dainik Gomantak
गोवा

Goa Bench: गोवा खंडपीठाने वेळसाव पंचायतीची 'दुहेरी रेल्वेमार्गाची' याचिका फेटाळली

Goa Bench: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वेळसाव पंचायतीची याचिका फेटाळून लावली.

दैनिक गोमन्तक

Goa Bench: दुहेरी रेल्वेमार्गाच्या प्रकल्पासाठी पंचायत किंवा राज्य सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही असे स्‍पष्‍ट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने वेळसाव पंचायतीची याचिका फेटाळून लावली.

वेळगाव पंचायतीच्या क्षेत्रातून जाणाऱ्या दुहेरी रेल्वेमार्गासाठी रेल्वे अधिकारिणीने परवानगी घेतलेली नाही अशी याचिका पंचायतीने सादर केली होती. या प्रकल्‍पाला वेळसाव ग्रामस्थांचा विरोध आहे. अनेकांच्या जमिनी त्यासाठी जाणार आहेत.

तसेच, हा महामार्ग वस्तीजवळून जाणार असल्याने त्याचा परिणाम येथील लोकांच्या जनजीवनावर होऊ शकतो, असा दावा याचिकेत करण्‍यात आला होता. तसेच रेल्वे मार्ग वेळसाव गावातून न नेण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती करण्‍यात आली होती.

त्‍यावर ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सरकारची बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले की, रेल्वे कायद्यानुसार रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारशिवाय इतर कोणाचीही परवानगी लागत नाही. रेल्वे कायद्यातील कलम 11 नुसार रेल्वे प्रशासन रेल्वेमार्गासाठी स्वतःच निर्णय घेऊ शकते.

जनहित समोर ठेवूनच हा रेल्वेमार्ग उभारण्याचा केंद्रातून निर्णय झाला असल्याने त्यामध्ये कोणीही अडथळा आणून शकत नाही. संबंधित परिसरातील पंचायत अथवा राज्य सरकारलाही त्यास विरोध करता येत नाही असे सांगून ही याचिका फेटाळण्‍याची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT