Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

गोवा खंडपीठ: डॉक्टर आणि परिचारिकांवरील आरोपपत्र रद्द

दैनिक गोमन्तक

पणजी: डॉक्टर व परिचारिकांकडून उपचारावेळी झालेल्या निष्काळजणीपणामुळे बालकाला हात गमवावा लागला यासंदर्भात आगशी पोलिसांकडून दाखल झालेले आरोपपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केले. या निवाड्यामुळे डॉक्टर व परिचारिकांना दिलासा मिळाला आहे. निष्काळजीपणा झाल्याचा कोणताच पुरावा समोर न आल्याचे गोवा खंडपीठाने आदेशात नोंद केले आहे.

या प्रकरणात गोवा खंडपीठाने दोन वर्षांपूर्वी श्रीमती ॲनली डिलिमा यांच्या याचिकेत निवाडा देताना त्यांच्यावरील आरोपातून मुक्त केले होते. रुजारिता डिकॉस्ता तसेच सिसिलिया फिगरेदो व इतर 3 जणांच्या याचिकेबाबतही वेगळा संदर्भ न घेता त्यांच्यावरील आरोपही रद्द करण्यात येत असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे.

गोमेकॉ इस्पितळाच्या बालरोग तज्ज्ञ विभागाच्या डॉक्टर तसेच परिचारिकांकडून बालकावर शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याने त्याला उजवा हात गमवावा लागल्याची तक्रार अजित गावकर याने आगशी पोलिसांत दाखल केली होती. बालकाच्या जन्मानंतर त्याच्यावर योग्य उपचार करण्यात झालेल्या विलंबामुळे त्याच्या हाताला गँगरीन झाल्याने तो हात काढावा लागल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आले होते. आगशी पोलिसांनी यासंदर्भात या बालकावर उपचार केलेल्या बालरोग तज्ज्ञ विभागाच्या डॉक्टर व परिचारिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भादंसंच्या कलम 336 व 337 तसेच बाल कायद्याच्या कलम 8(2) खाली आरोप ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तपास करून 24 जून 2017 रोजी बाल न्यायालयात दाखल केले होते. आरोपपत्रात सादर केलेल्या आरोपाखाली या न्यायालयाला सुनावणी घेण्याचे अधिकार नसल्याने हे आरोपपत्र पणजी प्रथमश्रेणी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले होते.

या आरोपपत्रातील संशयित असलेल्या ॲनली डिलिमा यांच्या याचिकेत गोवा खंडपीठाने 27 फेब्रुवारी 2022 रोजी दिलेल्या निवाड्याद्वारे त्यांची आरोपपत्रातून मुक्तता केली होती. डॉक्टरना आरोपी करण्याबाबत राज्य सरकारने परवानगी दिली नव्हती. या प्रकरणासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने दिलेल्या अहवालात डॉक्टर व परिचारिकांकडून उपचारावेळी कोणत्याच प्रकारचा निष्काळजणीपणा झाल्याचे नमूद केले नव्हते. या कारणांच्या आधारावर खंडपीठाने तेव्हा निवाडा दिला होता.

आणखी संदर्भांची गरज नाही’

या दोन्ही याचिकांवरील सुनावणीवेळी तक्रादारतर्फे कोणीही उपस्थित नसल्याने ॲड. आश्‍विन भोबे यांचे यासंदर्भात न्यायालयाला मदत करण्यासाठी सहकार्य घेण्यात आले. त्यांनी या प्रकरणातील सहसंशयित ॲनली डिलिमा यांना ठरवण्यात आलेले निर्दोषत्व खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे या याचिकेसंदर्भात तोच निवाडा लागू करण्याबाबत आणखी संदर्भ घेण्याची गरज भासत नाही असे निरीक्षण निवाड्यात नोंदवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT