सदानंद शेट तानावडेंच्या आरोपांचे काँग्रेसकडून खंडन

अमरनाथ पणजीकरांचा टोला: खाते वाटपास विलंब का?
Sadanand Shet Tanawade
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak

पणजी: मागील भाजपच्या राजवटीत मायकल लोबो यांनी लुटीतून पैसा कमावला या भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या विधानाचा निषेध करत काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात बोलण्यापेक्षा तानावडे यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आर्थिक मदत का मिळत नाही व मंत्र्यांना खात्यांचे वाटप होण्यास उशीर का झाला याचे उत्तर जनतेला द्यावे असा टोला हाणला आहे.

Sadanand Shet Tanawade
पर्यावरणाच्या आढाव्याबाबत गोवा मागेच

मागील भाजप सरकारच्या काळात मंत्री असलेले मायकल लोबो यांनी लुटीतून पैसे केले आणि त्यांच्याकडे पैसे असल्याने लोबो यांना विरोधी पक्षनेतेपद बहाल केल्याचा आरोप तानावडे यांनी केला होता. तानावडे यांच्या आरोपांचा काँग्रेस निषेध करते. मागील भाजप सरकारमधील मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आणि पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होईल, असे त्यांना म्हणायचे आहे का? जर होय तर त्यांनी ते गोव्यातील जनतेला सांगावे, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या असंवेदनशील सरकारच्या प्रत्येक कारभारावर काँग्रेस लक्ष ठेवून असेल, असे पणजीकर म्हणाले.

मंत्री लूटमार करत होते हे माहीत होते तर तानावडे तेव्हा गप्प का बसले, असा सवाल त्यांनी केला. अशी लूट पुन्हा होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी व तशी खात्री लोकांना द्यावी. लोबो यांच्याकडे जो पैसा आहे तो त्यांनी आपल्या व्यवसायातून कमावलेला आहे आणि त्याचा करही ते सरकारला भरतात, असे पणजीकर यांनी स्पष्ट केले.

Sadanand Shet Tanawade
Panaji Municipal Corporation: स्थगिती न मिळाल्यास बांधकामे पाडण्याचा आदेश

काँग्रेसचे पदाधिकारी आणि विरोधी पक्षनेते कोण होणार याबाबत बोलण्याचा अधिकार तानावडे यांना कोणी दिला, असा सवाल करून पणजीकर म्हणाले की, भाजप सरकारने राज्याची लूट चालवली आहे हे आम्ही गोव्यातील जनतेला सातत्याने सांगत होतो. आता गोव्यातील लोकांना हे लक्षात आले असेल की ते एका पक्षाला एकगठ्ठा मते देण्यात आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात अपयशी ठरले असे महागात पडले आहे.

गोव्यातील 67 टक्के लोकांनी भाजपला नाकारले आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्याने अधिक अहंकारी झाला आहे आणि म्हणून शपथ घेण्यासाठी आणि मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यास वेळ लावला. खाते वाटप प्रक्रियेस विलंब झाला कारण प्रत्येकजण अशा विभागांसाठी लॉबिंग करत होते जिथे ते लुटून अधिक कमाई करू शकतात. निवडक खाते मिळवण्यासाठी मंत्री भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आमिष देत होते असा आरोप त्यांनी केला. गोव्यातील जनतेचे प्रश्न मांडण्यात तानावडे अपयशी ठरले आहेत, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com