Court Dainik Gomantak
गोवा

Arambol: हरमल येथील 'त्या' 62 बेकायदा बांधकामाचे खटले वेळेत निकालात काढा; गोवा खंडपीठाचा निर्देश

Arambol Illegal Constructions: हरमल येथील बेकायदा बांधकामांना दिलेल्या २१७ कारणे दाखवा नोटिसांवर तसेच ६२ अपिलांवर सुनावणी घेऊन त्या निकालात काढण्याचा आदेश जीसीझेडएमएला गोवा खंडपीठाने दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Bench About Illegal Constructions In Arambol

पणजी: हरमल येथील बेकायदा बांधकामांना दिलेल्या २१७ कारणे दाखवा नोटिसांवर तसेच ६२ अपिलांवर त्वरित सुनावणी घेऊन ठराविक वेळेत त्या निकालात काढण्याचा आदेश गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाला (जीसीझेडएमए) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.

ही कारवाई किती वेळेत केली जाईल त्याची माहिती पुढील सुनावणीवेळी द्यावी असे स्पष्ट केलेआहे. जीसीझेडएमएने यावर्षीच्या फेब्रुवारी व मार्च २०२४ मध्ये २१७ बांधकामांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्यावरील सुनावणी अजूनही पूर्ण न झाल्याचे सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले होते.

या अहवालानुसार काही बांधकामांच्या नोटिसा अजूनही सुनावणीसाठी प्रलंबित असल्याने हे निर्देश देण्यात आले आहेत. या स्वेच्छा याचिकेवरील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने सरकारी वकिलांना ही सुनावणी किती वेळेत पूर्ण केली जाईल त्याची माहिती सादर करण्यास सांगितले आहे.

हरमल पंचायतीने ६२ बांधकामे पाडण्याची नोटीस बजावली आहे त्याला पंचायत संचालकांकडे आव्हान देण्यात आले आहे. या आव्हान अर्जावरील सुनावणीही प्रलंबित आहे, अशी माहिती ॲमिकस क्युरीनी गोवा खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रकाराची गंभीर दखल घेत अतिरिक्त पंचायत संचालकांना या आव्हान अर्जावरील सुनावणी प्राधान्यक्रमाने घेण्याच्या सूचना द्याव्यात असे सरकारी वकिलांना सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT