High Court Decision on Madgao Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी हायकोर्टाकडून आरोपीला जामीन मंजूर!

High Court Decision on Madgao Case: पीडित मुलीच्या वयात आणि साक्षीदारांच्या साक्षीत तफावत जाणवल्याने न्यायालयाने आरोपीला २० हजार रुपये व इतर अटींवर मोकळे केले आहे

Akshata Chhatre

सासष्टी: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक झालेल्या संशियत आरोपीला मुंबई न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. सासष्टी तालुक्यातील १७ वर्षीय मुलीवर वर्ष २०२३ मध्ये लैंगिक अत्याचार झाला होता आणि या घटनेतील आरोपीला पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ कायद्याच्या ४, ८ व १२ अंतर्गत अटक केली होती. मात्र आता पीडित मुलीच्या वयात आणि साक्षीदारांच्या साक्षीत तफावत जाणवल्याने न्यायालयाने आरोपीला २० हजार रुपये व इतर अटींवर मोकळे केले आहे.

पीडित मुलीच्या पालकांनी मडगाव पोलीस स्थानकात या प्रकाराबद्दल तक्रार नोंदवली होती. अटकेनंतर संशयीत आरोपीने न्यायालयात दोन वेळा सुटकेसाठी अर्ज दाखल केले होते मात्र तरीही न्यायालयाने दोन्ही वेळा हे अर्ज फेटाळून लावले.

संशयित आरोपीच्या बाजूने केस लढणाऱ्या अॅड. रोहन देसाई यांनी पीडित मुलगी आणि तिच्या पालकांनी दिलेल्या साक्षीमध्ये तफावत असल्याचे न्यायालयाच्या नजरेत आणून दिले आणि म्हणून संशयित आरोपीची सुटका करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणातील संशयित आरोपी वर्ष २०२३ पासून कोठडीत होता, मात्र आता दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने २० हजार रुपये आणि इतर अटींच्या पार्श्वभूमीवर संशयित आरोपीचा जमीन मंजूर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हडफडे दुर्घटना; गर्दी आणि लहान दरवाज्यांमुळे लोक अडकले, पळून जाण्यासाठी मार्गच नव्हता; प्राथमिक तपासात धक्कादायक खुलासे

हडफडे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, तर जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत; CM प्रमोद सावंतांची घोषणा

Goa Bread History: 1500च्या दशकात पोर्तुगिज आले, भारतात सर्वांत पहिला 'पाव' गोव्यात तयार झाला; इथून तो मुंबईत गेला..

VIDEO: LIVE सामन्यात 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! बाचाबाचीनंतर संतापलेल्या आर्चरचा बाउन्सर, स्मिथनं थेट षटकार ठोकत दिलं उत्तर

30 कोटी रुपयांची फसवणूक, चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांना अटक; मनोरंजन विश्वात खळबळ!

SCROLL FOR NEXT