Tripura Judge Rape Case: त्रिपुरातील एका बलात्कार पीडितेने कोर्टाच्या चेंबरमध्ये एका न्यायाधीशाने तिच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. एका ज्येष्ठ वकिलाने सांगितले की, धलाई जिल्ह्याचे सत्र न्यायाधीश गौतम सरकार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने पीडितेच्या आरोपांची चौकशी सुरु केली आहे.
या महिलेने आरोप केला की, बलात्काराबाबत ती 16 फेब्रुवारी रोजी कमलपूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये गेली होती. महिलेने आपली तक्रार कमालपूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांकडे केली आहे. तक्रारीत महिलेने म्हटले की, मी 16 फेब्रुवारी रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या चेंबरमध्ये माझे म्हणणे नोंदवण्यासाठी गेले होते. मी माझे म्हणणे मांडणार असताना न्यायाधीशांनी माझा विनयभंग केला. मी त्यांच्या चेंबरमधून बाहेर आले आणि वकिलांना आणि माझ्या पतीला घडलेला प्रकार सांगितला.
दरम्यान, या घटनेबाबत महिलेच्या पतीने कमालपूर बार असोसिएशनकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन तात्काळ कारवाई करत जिल्हा आणि सत्र न्यायाधीश गौतम कुमार आणि मुख्य न्यायदंडाधिकारी सत्यजित दास यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कमालपूर येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांचे कार्यालय गाठले.
यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने कमालपूर बार असोसिएशनच्या सदस्यांचीही न्यायालयाच्या आवारात भेट घेतली. समितीने महिलेच्या आरोपांवर त्यांची भूमिका ऐकून घेतली. बार असोसिएशनचे सचिव शिवेंद्र दासगुप्ता म्हणाले की, आम्ही आमचे मुद्दे समितीसमोर मांडले आहेत.
न्यायमूर्तींवरील आरोपांबाबत त्रिपुरा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल व्ही पांडे म्हणाले की, या प्रकरणाबाबत आम्हाला अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. राज्यातील इतर लोकांप्रमाणे मलाही मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याची माहिती मिळाली. आम्हाला योग्य स्वरुपात तक्रार प्राप्त झाल्यावर आम्ही निश्चितपणे योग्य ती कारवाई करु.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.