Goa Bench | Goa High Court of Bombay  Dainik Gomantak
गोवा

Goa Bench: गोवा खंडपीठाकडून रगाडा रेती उत्खननाच्या वसुलीसाठी 'समिती' स्थापन

Goa Bench: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल चार सदस्यीय समिती स्थापन केली.

दैनिक गोमन्तक

Goa Bench: रगाडा नदीतून बेकायदेशीर रेतीउपसा करून सुमारे 1.64 कोटींच्‍या मालमत्तेची विक्री करण्‍यात आलेली आहे. त्याची वसुली करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल चार सदस्यीय समिती स्थापन केली.

दरम्यान, या समितीला येत्या चार आठवड्यांत वसुली तसेच बेकायदेशीर रेतीउत्खननात कोण-कोण गुंतलेले आहेत, याचा तपास करून सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.

गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशात स्थापन केलेल्या समितीमध्ये पोलिस महानिरीक्षक, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व खाण संचालकांचा समावेश आहे.

सार्वजनिक मालमत्तेतून व रगाडा नदीतून झालेले बेकायदेशीर रेतीउत्खनन, पर्यावरणाचे झालेले नुकसान तसेच ज्याने हे केले आहे त्याच्याकडून 1.64 कोटींची वुसलीसाठी त्याच्या मालमत्तेची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्‍यान, हे बेकायदेशीर रेतीउत्खनन बरेच दिवस सुरू असून त्‍यात कोण-कोण गुंतलेले आहेत तसेच यंत्रसामग्री भाडेपट्टीवर घेण्यासाठी पैसे कोठून आणले याची माहिती द्यावी, असे निर्देश न्‍यायालयाने दिले आहेत.

संशयिताची जमीन, कार, स्‍कूटर ताब्‍यात

खाण खात्याने सुमारे 1.64 कोटीची वसुली करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. ज्याने हे उत्खनन केले आहे, त्याने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याकडे काहीच मालमत्ता नाही असे उत्तर दिले आहे.

खाण खात्याने केलेल्या तपासणीत त्याची सिंधुदुर्ग येथे असलेली जमीन मालमत्ता, तसेच त्याची स्कूटर व कार याचा शोध लावून ती ताब्यात घेतली आहे. अजूनही त्याची गोव्यात किंवा गोव्याबाहेर मालमत्ता किती आहे, याचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT