Goa Hospital: पेडणेमध्ये लवकरच मॉडर्न सॅटेलाईट हॉस्पिटल उभारण्‍यात येणार

Goa Hospital: सत्तरी तालुक्‍याच्‍या धर्तीवर पेडणे तालुक्यासाठी मॉडर्न सॅटेलाईट हॉस्पिटल लवकरच उभारण्‍यात येईल.
Goa Hospital | Vishwajit Rane
Goa Hospital | Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Hospital: सत्तरी तालुक्‍याच्‍या धर्तीवर पेडणे तालुक्यासाठी मॉडर्न सॅटेलाईट हॉस्पिटल लवकरच उभारण्‍यात येईल. तसेच सत्तरी तालुक्‍याप्रमाणेच या तालुक्‍यातील युवकांना नोकऱ्या मिळाव्‍यात यासाठी आपण स्‍वत: प्रयत्‍न करीन, अशी ग्‍वाही आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. आज सोमवारी राणे यांनी पेडणे तालुक्‍याचा दौरा केला. त्‍यावेळी ते बोलत होते.

तालुक्‍यात लवकरच मोपा विमानतळ आणि आयुष इस्‍पितळ होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांतून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपणही प्रयत्न करणार आहे, असे राणे म्‍हणाले.

Goa Hospital | Vishwajit Rane
Vijay Sardesai: मांडवीतील कॅसिनो जमिनीवर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशिल

दरम्‍यान, इस्‍पितळातील सत्तरी तालुक्‍यातील काही कर्मचारी लवकर घरी जातात, याकडे पत्रकारांनी राणे यांचे लक्ष वेधताच अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाईल, असे ते म्‍हणाले.

स्‍थानिकांना घरे किंवा रस्‍ते उभारण्‍यासाठी वन खात्यातर्फे ज्या काही अडचणी असतील, त्‍या दूर केल्‍या जातील. शिवाय नगरनियोजन खात्याअंतर्गत काही अडचणी असतील तर त्‍याही सोडविल्‍या जातील, असे राणे म्‍हणाले.

Goa Hospital | Vishwajit Rane
Water Supply: पुढील दोन दिवस पेडणे तालुक्याला मर्यादित पाणी पुरवठा

पेडणे तालुक्यात कुठेही बेकायदा डोंगरकापणी चालू असेल तर नगरनियोजन खाते त्वरित कारवाई करणार आहे. तशा प्रकारची सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्याचे नगरनियोजनमंत्री राणे म्‍हणाले.

सत्तरीच्‍या धर्तीवर तुये आणि कासारवर्णे सामुदायिक आरोग्‍यकेंद्रात अत्‍याधुनिक सोयीसुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या जातील, असेही ते म्‍हणाले. दरम्‍यान, तालुक्यातील पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य, जिल्हा पंचायत सदस्य व नागरिकांनीही मंत्री राणे यांच्यासमोर समस्‍या मांडल्या. त्‍यानंतर त्‍यांनी श्री भगवती देवीचे दर्शन घेतले.

Goa Hospital | Vishwajit Rane
Cortalim ZP: मार्सियाना वास यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मंत्री राणे यांच्‍या दौऱ्यावेळी त्‍यांच्‍यासमवेत स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, भाजप मंडल अध्यक्ष तुळशीदास गावस, जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंच आणि सरकारी अधिकारी उपस्‍थित होते.

मांद्रेसाठीही लवकरच 108 रुग्णवाहिका

यावेळी मंत्री राणे यांनी पेडणे (Pernem) मतदारसंघासाठी खास 108 रुग्णवाहिकेचे उद्‌घाटन केले. अशीच रुग्‍णवाहिका लवकरच मांद्रे मतदारसंघातही उपलब्ध करून देण्‍यात येणार आहे. मांद्रे मतदारसंघाचाही आपण लवकरच आमदार जीत आरोलकर यांच्यासोबत दौरा करणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. बालवाडी, अंगणवाडीतील मुलांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून त्यांना चांगल्या सुविधा, क्रीडा मैदान आदी सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे मंत्री राणे म्‍हणाले.

Goa Hospital | Vishwajit Rane
IN Pictures: जल्लोष, उत्साह! U-17 महिला फिफा फुटबॉल स्पर्धेचे जोषात उद्धाटन

कासारवर्णे आरोग्यकेंद्र सुसज्ज बनविणार

‍आपल्‍या दौऱ्याची सुरूवात करताना आरोग्‍यमंत्री राणे यांनी कासारवर्णे सामुदायिक आरोग्यकेंद्राला भेट देऊन तेथील समस्‍या जाणून घेतल्‍या. आरोग्‍यकेंद्राची इमारत पूर्ण जीर्ण झाल्याचे त्यांच्या लक्षात आणून देताच मुख्‍यमंत्र्यांशी याबाबत आपण चर्चा करून लवकरच सर्व प्रकारच्या सोयीसुविधा असलेली सुसज्ज इमारत उभारण्‍यात येईल, असे आश्‍‍वासन त्‍यांनी दिले. पेडण्‍यातील जनतेला चांगल्‍या आरोग्‍य सुविधा मिळाव्‍यात यासाठी आपण प्रयत्‍नशील असेन, असेही ते म्‍हणाले.

विश्‍‍वजीत राणे, आरोग्‍यमंत्री-

सरकारी कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत. त्‍यांनी लोकांची कामे वेळेवर व प्रामाणिकपणे केली पाहिजेत. ते त्‍यांचे कर्तव्‍यच आहे. परंतु कामचुकार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्‍यांच्‍यावर कडक कारवाई होणारच. मग ते सत्तरीतील असले तरीही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com