Goa Bench  Gomantak Digital Team
गोवा

Goa Bench : 161 शॅक्सना कायदा पाळावाच लागणार

गोवा खंडपीठाचे निर्देश : सर्व परवान्यांशिवाय टाळे काढू नका

गोमन्तक डिजिटल टीम

Mumbai High Court Goa Bench: कळंगुट-कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरील161शॅक्सना टाळे ठोकण्यात आले आहे. या शॅक्स चालकांनी कायद्यानुसार आवश्‍यक सर्व परवाने घेतल्याशिवाय हे टाळे खुले करू नये, असे निर्देश गोवा खंडपीठाने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले. त्यामुळे या शॅक्स चालकांवर संकट आले आहे.

गोवा प्रदूषण मंडळाचा परवाना असला तरी संबंधित पंचायत व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवानाही महत्त्वाचा आहे, असे नमूद करत ही सुनावणी 2 मेपर्यंत तहकूब केली.

सुमारे 161 शॅक्स चालकांकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना नसल्याने त्याची शहानिशा करून बंद करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले होते.

अनेक वर्षे अवैध व्यवसाय

पर्यटन खात्याकडून शॅक्स चालकांना जागा निश्‍चित करून दिल्यानंतर त्यासाठी लागणारा तात्पुरता परवाना दिला जातो. मात्र, शॅक्स चालक सर्व आवश्‍यक परवाने घेण्याचे टाळतात.

पर्यटन खात्याच्या तात्पुरत्या परवान्याच्या आधारे हे शॅक्स चालक सर्व परवाने मिळण्यापूर्वीच व्यवसाय सुरू करतात. त्यामुळे अनेक वर्षे अशाचप्रकारे शॅक्स व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT