FDA Action in Mapusa: केळी पिकवण्यासाठी केमिकलचा वापर, म्हापसा येथे 800 किलो केळी जप्त

Mapusa FDA Action
Mapusa FDA ActionDainik Gomantak
Published on
Updated on

FDA Action in Mapusa: अन्न आणि औषध प्राशासनाच्या वतीने (FDA) आज (बुधवारी, दि.05) म्हापसा सबयार्ड येथे फळे कृत्रिमरीत्या पिकवली जातहेत का? याबाबत तपासणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान एका घाऊक दुकानात सुमारे 800 किलो केळी रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आढळून आले. पथकला याठिकाणी केळीचा मोठा साठा असल्याचे आढळून आले.

म्हापसा नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांच्या मदतीने या दुकानातून केमिकल लिक्विड इथाफोन जे केळी पिकवण्यासाठी वापरण्यात आले होते ते जप्त करण्यात आले आणि केळीचा साठा नष्ट करण्यात आला.

नष्ट करण्यात आलेल्या केळीचा साठा अंदाजे रु. 65,000 रूपये किमतीचा होता अशी माहिती समोर आली आहे. तसेच फळांचे नमुने घेऊन अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

Mapusa FDA Action
Atal Setu: महत्वाची बातमी! अटल सेतूची एक लेन उद्या खुली होणार, वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा?

दरम्यान, उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर फळांची आवक बाजारात येत आहे. उन्हाचा कडाका वाढल्याने थंड पेय जास्त पिले जातात याशिवाय फळांचा रस देखील अधिक प्रमाणात पिला जातो. त्यामुळे या दिवसांत फळांची मागणी अधिक असते. त्यामुळे चढ्या भावाने फळांची विक्री होते.

याचा फायदा घेण्यासाठी काही दुकानदार फळे रासायनिक पद्धतीने पिकवतात. व त्याची विक्री करतात. दरम्यान, रासायनिक पद्धतीने पिकवलेली फळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे फळे घेताना काळाजी घ्यावी असे आवाहन तज्ञ करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com