Anmod Ghat Update Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: अनमोड रस्त्याबाबत नवी अपडेट! 15 सप्टेंबरपासून होणार खुला; उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Goa Belgaum Road: अनमोड घाटातील रस्ता कोसळल्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी रस्ता विभागाने आणखी दोन महिने अवजड वाहने या मार्गावरून बंद ठेवावीत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

Sameer Panditrao

फोंडा: अनमोड घाटातील रस्ता कोसळल्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी सार्वजनिक रस्ता विभागाने आणखी दोन महिने अवजड वाहने या मार्गावरून बंद ठेवावीत, अशी मागणी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

यासंदर्भात उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर, मामलेदार मनोज कोरगावकर, रस्ता विभाग अधिकारी सत्येंद्र भोबे, आनंद वाघुर्मेकर, कंत्राटदार अरुण कुडचडकर, वाहतूक पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी अनमोड घाटातील रस्ता कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली आणि यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित रस्ता विभागाला हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी १० दिवसांचा अवधी दिला असून रस्त्याची सर्व कामे पूर्ण करून येत्या १५ सप्टेंबरपासून अनमोड मार्गे रस्ता अवजड वाहनांसाठी खुला करणार असल्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर यांनी सांगितले.

अधिकारी लागले कामाला

दैनिक ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन रस्ता कोसळलेल्या ठिकाणाची संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आवश्यक अशा ठिकाणी बॅरिकेड्स तसेच इतर ठिकाणी सूचना फलक लावावेत, तसेच रस्त्याच्या बाजूची झाडे-झुडपे कापून रस्ता वाहतुकीस योग्य करावा, अशा सूचना संबंधित कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोंडकर यांनी दिल्या आहेत.

‘गोमन्तक टीव्ही’चे कौतुक

लॉरी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत च्यारी यांनी दैनिक ‘गोमन्तक’ आणि ‘गोमन्तक टीव्ही’चे आभार मानले. जिल्हाधिकाऱ्यांनी आमची समस्या ऐकली असून १५ सप्टेंबरपर्यंत अनमोड मार्गे रस्ता वाहतुकीस खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

Afghanistan Pakistan Clash: तालिबानच्या हल्ल्याने पाकिस्तानची नाचक्की! सैनिकांच्या पॅन्ट आणि शस्त्रे जप्त; 48 तासांची युद्धबंदी जाहीर Watch Video

Inspirational Story: पुत्र व्हावा ऐसा... मुलाने आई - बाबांसाठी अमेरिकेत खरेदी केले आलिशान घर, कार; US दर्शनही घडवले Watch Video

Diwali Muhurat: गोव्यात धाकटी दिवाळी कधी? प्रदोष काळ ठरू शकतो मोठा 'अडथळा' तारखांचा गोंधळ संपवा; अचूक मुहूर्त वाचा

Goa Live Updates: चंद्रेश्‍वर-भूतनाथ संस्‍थानात सोमवारी पालखी उत्‍सव

SCROLL FOR NEXT