Vishwajit Rane Google
गोवा

TB विरोधात लढण्यासाठी गोवा सरकार घेणार AI ची मदत, लवकर निदानासाठी होणार फायदा

TB Eradication Awareness Campaign: टीबी निर्मूलनासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण पावलांमुळे गोवा देशातील आदर्श राज्य ठरू शकते, अशी खात्री आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

TB Eradication Awareness Campaign Vishwajit Rane

पणजी: टीबी निर्मूलनासाठी गोवा राज्याने निश्‍चय मित्र उपक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच, संवेदनशील भागांमध्ये लक्ष केंद्रित मोहिमा, प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग आणि प्रभावी जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. गोव्यासारख्या छोट्या राज्याने टीबी निर्मूलनासाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण पावलांमुळे गोवा देशातील आदर्श राज्य ठरू शकते, अशी खात्री आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या १०० दिवसांचे ‘टीबी निर्मूलन अभियान’ यशस्वीपणे राबवण्याच्या दिशेने गोवा महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील मंत्र्यांसोबतच्या आभासी बैठकीत नड्डा यांनी राज्यस्तरापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत अभियानासाठी सर्वसमावेशक सहभाग वाढवण्याचे आवाहन केले.

राज्य पातळीवर अभियानाचे काम करत असताना गोवा खासगी-सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. यामध्ये एआय-आधारित एक्स-रे स्क्रिनिंग आणि वेळेवर निदानासाठी नेट मशीनचा वापर देखील केला जात आहे. याशिवाय महिला व बालविकास विभाग व आरोग्य सेवांचे समन्वय करून अंगणवाडी सेविकांचा गोरगरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग करण्याचा अभिनव प्रस्ताव केंद्रीय मंत्री नड्डा यांनी बैठकीत मांडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

Rohit-Virat Comeback: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी पुन्हा मैदानात उतरणार रोहित-विराट; ऑस्ट्रेलियात रंगणार रणसंग्राम

Goa Assembly Live: म्हादई अहवालाविषयी जलस्रोत खात्याने एनआयओला विचारणा केली आहे काय?

SCROLL FOR NEXT