उत्तर गोव्याच्या किनारपट्टीवरील कांदोळी, कळंगुट, बागा, हणजूणे, आश्वे, हरमल हे किनारे एकेकाळी अक्षत निसर्ग सौंदर्याची उदाहरणे होती. शुभ्र वाळूंसाठी हे किनारे ओळखले जायचे. मात्र पर्यटनाच्या आहारी गेलेल्या या किनाऱ्यांची रया गेल्या काही वर्षात पार हरवून गेली आहे. पर्यटकांचा अनियंत्रित ओघ, कचरा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यातून या किनाऱ्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते अक्षरशः गुदमरताहेत.
हल्ली कुणीतरी नव्याने केलेल्या या प्रसिद्ध जागांच्या उपहासात्मक व्याख्या इंटरनेटवर फडकत आहेत. या व्याख्या करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव मात्र उघड केलेले नाही. पण एकंदरीत त्या जागांची आताची स्थिती पाहता या व्याख्या त्यांना अगदी शोभेसारख्या आहेत हे निश्चित. वाचताना हसूही येते आणि आपलीच कीवही येते.
मोरजी आणि आश्वे : हे रशियन दूतवासाचे अनधिकृत ठाणे आहे. इथे कोकणीपेक्षा रशियन भाषा जास्त ऐकू येईल. उत्तम समुद्रकिनारे- फक्त वेगाने जाणाऱ्या गाड्या आणि उत्स्फूर्त फोटोशूटकडे लक्ष असू द्या.
बागा : जिथे ईडीएम मृत्युपंथाला लागते. त्याशिवाय असा एकमेव किनारा ज्यातील वाळूत शिंपल्यांपेक्षा बिअरच्या बाटल्या अधिक सापडतील.
हरमल : जिथे गोरे लोक स्वतःच्या शोधा देतात परंतु आपला पासपोर्ट हरवतात. सकाळी योगा, रात्री सायट्रान्स पार्ट्या आणि 24 तास आयडेंटिटी क्रायसिस!
कांदोळी : 'उत्तर गोव्यातील उपनगर, जिथे पर्यटकांना आपण बागांमध्ये नाही आहोत म्हणून कोणीतरी 'वेगळे' आहोत असे वाटते. पण बागामध्ये किमान स्वच्छ रेस्टॉरंट्स तरी आहेत.
आसगाव : इथे प्रत्येक तिसरे घर हे एक कॅफे आहे आणि प्रत्येक कॅफे हस्तकला दालन. या गावात स्थानिक लोकांची जागा आता इन्फ्लुएन्सर्सनी घेतली आहे.
कळंगुट : गोव्याला प्रथम येणाऱ्यांसाठी हे स्थळ 'स्टार्टर पॅक' आहे. तुम्ही तिथे सकाळी नाश्ता करत आहात आणि पाच पंजाबी रिमिक्स गाणी ऐकली नाहीत असे कसे होईल?
हणजुणे : एकेकाळी हिप्पींचे आश्रयस्थान. आता ते उपचारात्मक रिट्रीट आहे किंवा महागडे फ्ली मार्केट. तुम्ही एकतर आध्यात्मिकदृष्ट्या प्रबुद्ध आहात किंवा ऑनलाइन कोम्बुचा विकता आहात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.