Beach Wedding Canva
गोवा

Goa Beach Wedding: गोव्यात समुद्रकिनारी लग्नसोहळ्याचा विचार करताय? सरकारने ‘तो’ निर्णय मागे घेतला, वाचा नवीन दर

Goa Destination Wedding Cost: गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने नुकतीच बीच वेडींगच्या शुल्कात भरमसाठ वाढ केली होती

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Coastal Zone Management Authority Beach Wedding Fees

पणजी: गेल्या आठवड्यात गोवा सरकारने समुद्रकिनाऱ्यावर होणारे विवाह सोहळे आणि कार्यक्रमांसाठी प्रतिदिन एक लाख रुपये शुल्कवाढ करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला. दरम्यान, सदर शुल्क वाढीसंबंधी उद्‌भवलेला घोळ टायपिंग मिस्टेकमुळे घडल्याचे स्पष्टीकरण पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिले आहे.

त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच संपूर्ण पाच दिवसांच्या कार्यक्रमासाठी एक लाख रुपये शुल्क लागू होईल, मात्र पाच दिवसांनंतर प्रतिदिन १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था आणि सरकारी महामंडळे यांना शुल्कात ७५ टक्के सूट मिळणार आहे.

सरकारने किनारी विवाहसोहळा तसेच इतर कार्यक्रमांसाठी दररोज लाख रुपये शुल्क परवडणारे नाही त्यामुळे ही शुल्क वाढ मागे घेण्याची गरज आहे, अशी मागणी टीटीजीचे अध्यक्ष जॅक सुखीजा यांनी केली होती.

सुखीजा यांच्या मागणीनंतर त्यावर विचारविनिमय करून शुल्क वाढीचा निर्णय तत्काळ रद्द केला. पर्यावरण खात्याने ही शुल्कवाढ करताना टीटीजीला विश्‍वासात घेतले नव्हते, त्यामुळे सुखीजा यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinoo Mankad Trophy: गुजरातचा गोव्यावर दणदणीत विजय! 5 लढतीतील चौथा पराभव; गटसाखळीत हाराकिरी

Goa Today's News Live: वीज कोसळून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू? कोलवा येथे रुमच्या बाहेर आढळला मृतदेह

Netravali: 'एसी'त बसणारे ग्रामीण जनतेला सुखाने जगू देत नाहीत! व्‍याघ्र प्रकल्‍पावरुन फळदेसाईंचा टोला; नेत्रावळी ग्रामस्थांचा विरोध

Rama Kankonkar: 'मोबाईलचा डेटा फॉरमॅट का केला'? हल्लाप्रकरणी रामा, जेनिटोंचे वकील भिडले; अटक बेकायदेशीर असल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; दिगंबर कामत लहान कसे?

SCROLL FOR NEXT