Goa Shack Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shack Policy: 'या' दोन ठिकाणी बीच बेडला परवानगी नाहीच; प्रत्येक किनाऱ्यावरची शॅकची संख्या, उभारणीबाबतचे नियम जाहिर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tourism: तेमवाडा-मोरजी आणि हणजुणे येथे यापुढे एकाही बीच बेडसाठी परवाना दिला जाणार नाही. कासव अंडी घालण्याचे ठिकाण म्हणून मोरजीसंदर्भात हा निर्णय घेतला आहे. तसा आदेश गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने आज (गुरुवारी) रात्री पर्यटन खात्याला जारी केला.

त्यामुळे पर्यटन खात्याचा शॅक परवान्यासाठी सोडत काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वझरांत येथे गेल्या वेळच्या आठऐवजी आता केवळ तीन शॅक उभारायला परवानगी मिळाली आहे.

प्रत्येक किनाऱ्यावर किती शॅक देता येतील, याची संख्या निश्चित करण्यासाठी पर्यटन खात्याने किनाऱ्यांच्या धारण क्षमतेचा अभ्यास करवून घेतला होता. त्याशिवाय शांतता क्षेत्राविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आदेश जारी केला आहे.

कासव संवर्धन क्षेत्राबाबत राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश आहे. या सगळ्‍यांचा विचार करून गोवा राज्य किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव डॉ. स्नेहा गीते यांनी आदेश जारी केला आहे.

प्राधिकरणाने हा आदेश जारी न केल्याने पर्यटन खात्याला सोडत काढणे शक्य झाले नव्हते. कालपासून याविषयी तयारी सुरू होती. पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांना बुधवारी रात्री या विषयाची कल्पना देण्यात आली होती.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी स्वत: बुधवारी रात्री मंत्रालयात आले होते. आजही दिवसभर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे विचारपूस करून त्यांनी या विषयाची माहिती घेणे सुरूच ठेवले होते.

प्राधिकरणाने मागील खेपेप्रमाणेच उत्तर गोव्यात २५४ तर दक्षिण गोव्यात १०५ शॅकची संख्या कायम ठेवल्याने शॅक व्यावसायिकांत नाराजी निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली आहे.

असे असले तरी, तेमवाडा-मोरजी येथे शॅक घालण्यास परवानगी नाकारली आहे. तेथे परवानगी दिली जावी, यासाठी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या माध्यमातून प्रयत्नरत होते.

बांधकामात सिमेंटला थारा नाही

शॅकची उभारणी बांबू, लाकडी खांब, विणलेल्या झावळ्या यांपासूनच करावी लागेल. पोलाद आणि लोखंडाच्या 30 टक्के वापरालाच परवानगी आहे. कॉंक्रिट घालता येणार नाही. सिमेंटचाही वापर करता येणार नाही. पाण्यासाठी कूपनलिका (खासगी जागेतही) खोदता येणार नाही.

दोन शॅकमध्ये 8 मीटरचे अंतर ठेवावे लागेल. शॅकची उभारणी करण्यापूर्वी आणि व्यवसायास सुरवात करण्यापूर्वी अशी दोन वेळा गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार परवानगी घ्यावी लागणार आहे.

पार्ट्यांसह कर्णकर्कश संगीतावरही निर्बंध

1. मोरजी व मांद्रे किनारी शांतता क्षेत्र म्हणून अधिसूचित केल्याने तेथे ध्वनिप्रदूषण मापन यंत्रणा प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा पर्यटन खात्याने उभारावी, असे आदेशात म्हटले आहे.

आंतर भरती विभागात बीच बेड ठेवता येणार नाहीत. शॅकच्या बाह्य भागात विद्युत रोषणाई करता येणार नाही.

2. शॅकमधील अंतर्गत विजेचे दिवे प्रखर नसावेत. त्यांचा प्रकाश समुद्राच्या दिशेने पडणार नाही, याची दक्षता घ्यावी.

शॅकमध्ये पार्ट्यांचे आयोजन करता येणार नाही, तसेच मोठ्याने संगीत वाजवता येणार नाही. किनाऱ्यावर वाहनही नेता येणार नाही, असे प्राधिकरणाने आदेशात नमूद केले आहे.

शॅकसाठी अटी

  • यंदापासून शॅक किनाऱ्यापासून १ मीटर उंचीवर उभारावे लागतील.

  • सांडपाणी व मल-जल एकत्रित करण्यासाठी १ मीटर उंचीचा गोल किंवा चौकोनी आकाराच्या झाकण असलेल्या भांड्याची व्यवस्था करावी लागेल.

  • शिवाय त्याची विल्हेवाट गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार लावावी लागेल.

  • स्वयंपाकघरातील टाकावू तेल व ग्रीस यांच्या विल्हेवाटीची शास्त्रीय व्यवस्था करावी लागेल.

  • रस्त्यापासून ५० मीटर दूरवर असलेल्या शॅकसाठी सांडपाणी निचरा व मलनिस्सारण प्रकल्पाची व्यवस्था करावी लागेल.

  • त्याला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे.

किनाऱ्याचे नाव शॅकची संख्या

सावतावाडो-कळंगुट २८

खोब्रावाडो-कळंगुट १९

उमतावाडो-कळंगुट १६

माड्डोवाडो-कळंगुट १०

तिवयवाडो-कळंगुट १७

गौरावाडो-कळंगुट १९

..........................

शिमेर-कांदोळी ८

एस्क्रीवाडोक-कांदोळी १०

कामोटीवाडो-कांदोळी १९

मुरूड-कांदोळी १२

वाडी-कांदोळी २०

दांडो-कांदोळी १८

..........................

केरी (पेडणे)

हरमल १२

मांद्रे १०

मोरजी ११

वझरांत ३

हणजुणे ७

वागातोर ५

शिरदोन २

शापोरा २

माजोर्डा १०

कोलवा ८

लॉंगिनोज ३

कोलमार (कोलवा) १

बाणावली १२

कालवाडो ३

वार्का ४

फात्राडे (वार्का) ७

मोबोर (केळशी) ६

खांजीवाडो (केळशी) ११

..........................

वेळसांव २

आरोशी ४

उतोर्डा ७

थोनवाडो (बेतालभाटी) ७

रानवाडो (बेतालभाटी) २

सनसेट बीच (बेतालभाटी) १

घोणसुआ (बेतालभाटी) २

सेर्नाभाटी (कोलवा) ३

वेलुदो (बाणावली) ४

झालोर ४

बायणा २

बोगमाळो २

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT