Calangute: कळंगुटमध्ये ऑनलाईन गॅम्बलिंगवर छापा; उत्तर प्रदेशातील एकास अटक

कळंगुट पोलिसांची कारवाई
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute: कळंगुट येथे अवैधरित्या सुरू असलेल्या ऑनलाईन गॅम्बलिंगवर पोलिसांनी गुरूवारी छापा टाकला. यावेळी मूळच्या उत्तर प्रदेशातील असलेल्या एकास अटक करण्यात आली आहे.

अजय मनूलाल कुमार (वय 32) असे त्याचे नाव आहे. तो सध्या तिसकर पर्वरी येथे वास्तव्यास आहे. अजय याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ऑनलाईन गॅम्बलिंगचे 42 हजार रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर 1500 रूपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

Goa Police
Rohan Khaunte: होम स्टे, कॅराव्हॅन धोरण महिन्याभरात; धनुष्यबाण आकाराची इमारत, डिजिटल नोमॅड व्हिसासाठी प्रयत्न...

पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून येथे अवैध ऑनलाईन गॅम्बलिंग सुरू असल्याचे समजले होते. एका बंदिस्त जागी हा प्रकार सुरू होता. गॅम्बलिंगबाबतच्या कायद्यांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्सनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन यांच्या देखरेखीखाली पर्वरीचे एसडीपीओ विश्वेश करपे आणि पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या पथकात पोलिस कॉन्स्टेबल आमिर गरड, विजय नाईक यांचाही समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com