Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Shack Policy: शॅक्सच्या ‘सबलेटिंग’ प्रकरणांचा पुनर्विचार होणार! मंत्री खंवटेंनी दिली माहिती; 23 परवान्यांचे होणार नूतनीकरण

Goa Beach Shacks: शॅक धोरणात सबलेटिंग म्हणजेच शॅक दुसऱ्याला चालविण्यास, भाड्याने देण्यास सक्त मनाई आहे आणि गेल्या वर्षी खात्याला यासंदर्भात उल्लंघनांबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या.

Sameer Panditrao

पणजी: शॅक धोरणात सबलेटिंग म्हणजेच शॅक दुसऱ्याला चालविण्यास, भाड्याने देण्यास सक्त मनाई आहे आणि गेल्या वर्षी खात्याला यासंदर्भात उल्लंघनांबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सबलेटिंगबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय झाला आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंत्री खंवटे यांनी शॅकमालक आणि शॅक संघटनेच्या प्रतिनिधींसोबत पर्वरीत बैठक घेतली, ज्यात शॅक धोरणाशी संबंधित बाबी तसेच शॅक सबलेटिंग प्रकरणांसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

खंवटे यांनी सांगितले, की शॅक हे गोव्याच्या पारंपारिक पर्यटन अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहेत आणि गोव्यातील लोकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

आढावा घेतल्यानंतर असे आढळून आले, की २३ शॅक हे गोव्यातील लोकांना देण्यात आले होते, ज्यांची ओळख पेमेंट ट्रॅकिंग कोडद्वारे झाली होती. सुरुवातीला ही प्रकरणे रद्द करण्यात आली होती. मात्र, शॅक संघटना आणि स्थानिक आमदारांच्या निवेदनानंतर तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर, सरकारने या प्रकरणांचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री खंवटे म्हणाले.

२३ शॅक्सच्या परवान्यांचे होणार नूतनीकरण

सबलेटिंग संबंधी आढावा घेतल्यानंतर समोर आलेल्या समस्यांचे निराकरण करून पूर्ण शुल्क भरल्यानंतर या २३ शॅक्सच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जाईल, तसेच यापुढे नॉन-सबलेटिंग कलमाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर निर्देश दिले जातील, असे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT