Goa Beach Shack: संततधार पावसाचा 'शॅक'मालकांना फटका! उभारणी ढकलली पुढे; उत्साहावर विरजण

Goa Tourism: किनारी भागात वाढलेली देशी पर्यटकांची संख्या पाहता यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शॅक व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन अनेकांनी केले होते.
Goa Beach Shacks
Goa Beach ShacksCanva
Published on
Updated on

पणजी: किनारी भागात वाढलेली देशी पर्यटकांची संख्या पाहता यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शॅक व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन अनेकांनी केले होते. सध्या पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शॅक सुरू करणे त्यांना लांबणीवर टाकावे लागणार असे दिसते.

पर्यटन खात्याने यंदा शॅक परवान्यांचे वेळेत नूतनीकरण केल्याने ऑक्टोबरऐवजी सप्टेंबरमध्येच व्यवसाय सुरू करता येईल, असे शॅक चालकांना वाटत होते. त्यासाठी पावसाने उसंत घेतल्यास शॅक उभारणीचा मनसुबा त्यांनी केला होता. मात्र सध्या पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शॅक उभारणी लांबणीवर टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

नियमानुसार एप्रिल अखेरीस त्यांनी शॅक गुंडाळून ठेवले आहेत तेच पुन्हा उभारण्यासाठी किमान ३-४ दिवसाचा वेळ लागणार आहे. पर्यटन खात्याने परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया देखील वेळेत केली तर सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या योजना अस्तित्वात येण्यास व्यत्यय आला आहे. शॅक व्यावसायिकांना आपला “बेत पुढे ढकलावा लागला” असं त्यांना सांगावे भाग पडले आहे.

Goa Beach Shacks
Goa Beach Shack: खुशखबर! जूनमध्ये वाढले पर्यटक, बीच शॅक्सना मुदतवाढ द्या; व्यावसायिकांकडून होतेय मागणी

गोव्यात सध्या मुसळधार पाऊस आहे, ज्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर शॅक उभारणीसाठी नियोजित वेळापत्रक अडचणीच्या अवस्थेत आलं आहे. सुरळीत कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने शॅकधारकांसाठी व्यवसाय नियोजनात मोठी उधळपट्टी झाली आहे.

Goa Beach Shacks
Goa Beach Shacks: बीच शॅक्‍सबाबत मोठी बातमी! बांधणीसाठी पारंपरिक साहित्य अनिवार्य; ‘पर्यटन’च्या आराखड्याला प्राधिकरणाचा ब्रेक

शॅक मालक कल्याण संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांच्या म्हणण्यानुसार,“पाऊस इतका जोरात आहे की पाठपुरावा करण्याचे प्रयत्न होऊनही आम्हाला वेळेत तयारी करता येणार नाही.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com