Illegal Dance Bar Dainik Gomantak
गोवा

Dance Bar: गोव्यातील बेकायदेशीर डान्‍सबारवर कारवाई सुरुच

Dance Bar: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समुद्रकिनारी भागात ध्वनिप्रदूषणाविरोधात सध्‍या पोलिसांकडून कारवाई सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Dance Bar: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समुद्रकिनारी भागात ध्वनिप्रदूषणाविरोधात सध्‍या पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कळंगुट पंचायतीने बेकायदा डान्सबारविरोधात सोमवारपासून कडक पावले उचलली आहेत. काल रात्री दोन बेकायदा डान्सबारना टाळे ठोकण्‍यात आल्याची माहिती सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी दिली.

कळंगुट किनाऱ्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. परंतु अलीकडे पर्यटनाच्या नावाखाली किनारी भागात उतरलेल्या परप्रांतीय व्यवसायिकांनी अवैध धंदे, मसाज पार्लर, डान्सबार आदी प्रकार सुरू केल्याने पर्यटनाचा बट्ट्याबोळ होण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

शेवटी स्थानिकांचा आग्रह तसेच मागणीनुसार कळंगुट पंचायतीने अशा बेकायदा व्यवसायांना लगाम घालण्यासाठी सोमवारपासून धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत पोलिसांना ग्रामस्थांचे चांगल्यापैकी सहकार्य मिळत असल्याचे सरपंच सिक्वेरा यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी रात्रीही किनारी भागातील अवैध व्यवसाय तसेच डान्सबारवर कारवाई सत्र सुरूच होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT