Woman rescued by lifeguard Goa Dainik Gomantak
गोवा

मी आयुष्याला कंटाळलीये! जीवन संपविण्यासाठी महिलेने गोव्याच्या समुद्रात घेतली उडी, जीवरक्षकाने दिले जीवदान

Woman rescued by lifeguard Goa: राज्यात विविध समुद्रकिनारी १२ नागरिकांना वाचविण्यात दृष्टीच्या जीवरक्षकांना यश आले.

Pramod Yadav

मडगाव: ‘मी आयुष्याला कंटळाली आहे’, असे म्हणत ३७ वर्षीय महिलेने जीव देण्यासाठी समुद्रात उडी घेतली. या महिलेले दृष्टीच्या जीवरक्षकांनी जीवदान दिले. बायणा समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली. गेल्या आठवड्यात दृष्टीच्या जीवरक्षकांनी राज्यातील समुद्रकिनारी १२ नागरिकांना जीवदान दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, वास्को येथील महिलेने जीवदेण्यासाठी बायणा येथील समुद्रात उडी घेतली. यावेळी घटनास्थळी असलेल्या दृष्टीच्या जीवररक्षकांनी महिलेला वाचविण्यासाठी तत्काळ हालचाली करुन सुरक्षितपणे बाहेर काढले. मी आयुष्याला कंटाळली असून, आयुष्य संपवतेय, असे या महिलेने समुद्रात जाण्यापूर्वी म्हटले होते.

महिलेला समुद्रातून बाहेर काढल्यानंतर तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली असून, याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दुसरीकडे राज्यात विविध समुद्रकिनारी १२ नागरिकांना वाचविण्यात दृष्टीच्या जीवरक्षकांना यश आले. तसेच, दोन बेपत्ता झालेल्या लहान मुलांची पालकांशी भेट घडवून देण्यात आली.

माजोर्डा येथे खोल समुद्रात बुडणाऱ्या ४८ वर्षीय राजस्थानी पर्यटकाला वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. आश्वे समुद्रकिनारी हरियाणा येथील २१ आणि २५ वर्षीय दोन तरुणांना वाचविण्यात आले. याच ठिकाणी कर्नाटकच्या ४७ वर्षीय पर्यटकाला समुद्रात बुडण्यापासून वाचविण्यात आले.

दृष्टीच्या जीवरक्षकांनी मांद्रे आणि मोरजीच्या समुद्रकिनारी देखील दोन तरुणांना बुडण्यापासून वाचवले. मोरजी येथे ६६ वर्षीय गोमंतकीय व्यक्ती तर ३५ आणि २६ वर्षीय तरुणांना जीवदान दिले. बागा येथे समुद्रात लाटांच्या फटक्याने वाहून गेलेल्या तीन पर्यटकांना जीवरक्षकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT