ED Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील खाण व्यावसायिक राधा तिंबलो यांच्या मुलाची 37 कोटीची संपत्ती ED कडून जप्त

पॅंडोरा पेपर लीक प्रकरणी राधा तिंबलोची चौकशी केली जात होती.

Pramod Yadav

Pandora Papers Probe: गोव्यातील एका खाण व्यावसायिक राधा तिंबलो यांच्या मुलाची 36.8 कोटी किमतीची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) च्या कलम 37A(1) अंतर्गत रोहन तिंबलो विरुद्ध जप्तीचा आदेश जारी करण्यात आला आहे. रोहन राधा तिंबलो यांचा मुलगा आहे.

पॅंडोरा पेपर लीक प्रकरणी राधा तिंबलोची चौकशी केली जात होती. रोहनकडे ऑफशोअर फॅमिली ट्रस्ट आणि त्याच्या तीन अंतर्निहित कॉर्पोरेट संस्था आहेत. या संस्था सिंगापूरच्या अंतर्देशीय महसूल प्राधिकरणाच्या (IRAS) स्कॅनरखाली आल्या आहेत.

इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इंटरनॅशनल जर्नलिस्ट्स (ICIJ) ने 2021 मध्ये 'पॅंडोरा पेपर्स' जागतिक लीक उघडकीस आणले होते. यात भारतासह 200 हून अधिक श्रीमंत उच्चभ्रू लोकांच्या संपत्तीचे ऑफशोअर गुपिते उघड झाली होती.

फेडरल एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, Asiaciti Trust Singapore Pte Ltd ने Colares ट्रस्टला कॉर्पोरेट ट्रस्टी सोल्यूशन्स वितरित केल्याचे Pandora पेपर्स लीकच्या तपासात असे दिसून आले.

या ट्रस्टमध्ये, रोहन तिंबलो सेटलर या पदावर कर्यरत होते आणि त्यांची पत्नी मल्लिका तिंबलो आणि त्यांची मुले लाभार्थी म्हणून सामील झाली होती. अशी माहिती संस्थेने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT