Goa Agriculture | Farm Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: कृषी उत्पादन वाढीसाठी 'आत्मा'चे मिशन बार्देश!

Goa Agriculture: बार्देश हा कृषी उत्पादनातील प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो.

दैनिक गोमन्तक

Goa Agriculture: बार्देश हा कृषी उत्पादनातील प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश जमीन कृषी लागवडीखाली असून अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानासह नवीन बियाण्यांचा वापर करून उत्पादन वाढीवर भर देत आहेत.

काही शेतकरी नवनवे प्रयोग करून कृषी क्षेत्रात प्रगती साधत आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सीचीही (आत्मा) जोड लाभली आहे. शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी ‘आत्मा’तर्फे ‘मिशन बार्देश’ ही मोहीम राबवली आहे.

याअंतर्गत कृषी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, उत्पादनाचा खर्च कमी व मिळकत वाढवणे, तसेच विविध कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून दिला जात आहे. खरीप तसेच रब्बी हंगामात या योजना राबवल्या जातात.

दर्जेदार बियाण्यांचे जतन

राज्यातील पारंपरिक भाज्या तसेच डाळींच्या बियाणाचे जतन व्हावे, यासाठी ‘आत्मा’ने पावले उचलली आहेत. ही बियाणी शेतकऱ्यांकडून विकत घेऊन नंतर पुढच्या हंगामात त्यांना तीच पुन्हा लागवडीसाठी उपलब्ध करून दिली जातात. यात हळसांदे, तांबडी भाजी, वाल, वांगी, मूग यांचा समावेश आहे.

काळा तांदूळ, हळद लागवडीला प्रोत्साहन

‘आत्मा’तर्फे जास्तीच जास्त शेतकऱ्यांची सदस्य म्हणून नोंदणी सुरू आहे. यंदा खरीप हंगामासाठी काळा तांदूळ (ब्लॅक राईस) लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. नव्या जातीच्या हळद रोपांच्या माध्यमातून लागवडीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच झेंडू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

खाद्यपदार्थ प्रशिक्षण

फणसापासून विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षणही शेतकऱ्यांना दिले जाते. शेतकऱ्यांच्या भाताला चांगला भाव मिळावा यासाठी मार्गदर्शन केले जाते. गेल्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड, मधमाशी पालन तसेच कलम तयार करण्यावर भर दिला आहे.

किशोर भावे, प्रकल्प अधिकारी, आत्मा-

कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान व माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे ‘आत्मा’चे मुख्य ध्येय आहे. प्रत्येक दोन महिन्यांनी बैठकांतून आढावा घेतला जातो. कृषी योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात. गेल्या सहा महिन्यांत २८ कार्यशाळा घेतल्या असून ५३८ शेतकऱ्यांनी या उपक्रमांचा लाभ घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT