Goa Traffic Rules Violation : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना इंगा, कळंगुट पोलिसांची कारवाई

Goa Traffic Rules Violation : कळंगुट व परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून नो पार्किंग झोनमध्ये भाडे पट्टीवर देण्यात येत असलेल्या दुचाक्या तसेच कार पार्क करून रहदारीस अडथळा आणल्याच्या कारणांवरून स्थानिक पंचायत तसेच वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली.
Goa Traffic Rules Violation
Goa Traffic Rules ViolationDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट : कळंगुट व परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करून नो पार्किंग झोनमध्ये भाडे पट्टीवर देण्यात येत असलेल्या दुचाक्या तसेच कार पार्क करून रहदारीस अडथळा आणल्याच्या कारणांवरून स्थानिक पंचायत तसेच वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी चार कारगाड्या तसेच सहा दुचाक्या पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्या. यावेळी कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा तसेच वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक रामा परब तसेच अन्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

(Goa Traffic Rules Violation action by calangute police)

Goa Traffic Rules Violation
Porvorim News: मंदिरातील घंट्या चोर पोलिसांच्या जाळ्यात; पाच लाखाचे साहित्य जप्त

दरम्यान, यंदाचा पर्यटन हंगाम तोंडावर आलेला असतानाच आतापासूनच मोठ्या प्रमाणात देशी पर्यटकांनी कळंगुटमध्ये येणे सुरू केलेले आहे. अनेक पर्यटक जोडपी रेंट अ कार अथवा दुचाक्या घेऊन किनारी भागात फिरणे पसंत करत असतात त्यामुळे स्थानिकांबरोबरच याभागात व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेले परप्रांतीय तरुण आपापल्या भाडोत्री चारचाक्या तसेच दुचाक्या घेऊन रस्त्यावर उतरतात आणि मिळेल त्या मोकळ्या जागेत त्या पार्क करून ठेवतात, असे कळंगुटचे सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी सांगितले.

दुसऱ्या बाजूने भाडोत्री वाहने घेऊन फिरणारे पर्यटक येथील वाहतूक नियमांची जाणीव नसल्याने ताब्यातील दुचाक्या तसेच चारचाक्या बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या करतात. या प्रकारांमुळे या भागातील नियमीत वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच याभागात लहान-मोठे अपघात होणे आता नित्याचेच बनल्याचे कळंगुट वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक रामा परब यांनी सांगितले.

Goa Traffic Rules Violation
Porvorim News: मंदिरातील घंट्या चोर पोलिसांच्या जाळ्यात; पाच लाखाचे साहित्य जप्त

दरम्यान, कळंगुट पंचायत तसेच कळंगुट वाहतूक पोलीस यांनी शनिवारी केलेल्या संयुक्त कारवाईत कळंगुट व परिसरात बेकायदा पार्क करून ठेवण्यात आलेल्या चार मोटारगाड्या तसेच सहा दुचाक्या ताब्यात घेतल्या व दंड ठोठावला. कायदेशीर कारवाई नंतर त्या गाड्या सोडून देण्यात आल्याची माहिती कळंगुट वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक परब यांनी दै. गोमंतकशी दिली.‌

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com