Applied For Bail  Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: परेशची जामीनासाठी खंडपीठाकडे धाव, तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

परेश सध्या म्हार्दोळ पोलिस ठाण्यात कोठडीत असून त्याची कोठडीची मुदत रविवारी संपणार

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघातातील कारचालक संशयित श्रीपाद ऊर्फ परेश सावर्डेकर याने जामिनासाठी धडपड सुरूच ठेवली आहे. फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे.

ही सुनावणी ११ ऑगस्ट रोजी घ्यावी, अशी त्याच्या वकिलांनी केलेली विनंती गोवा खंडपीठाने फेटाळून त्यावरील सुनावणी १७ ऑगस्टला ठेवली आहे.

परेश सध्या म्हार्दोळ पोलिस ठाण्यात कोठडीत असून त्याची कोठडीची मुदत रविवारी संपणार आहे. त्यामुळे पोलिस त्याला सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत. त्यापूर्वीच त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करून त्यावरील सुनावणी प्राधान्यक्रमाने ११ रोजी घेण्याची विनंती वकिलांमार्फत केली.

कारण शनिवारपासून (12 ऑगस्ट) उच्च न्यायालयाला 16 ऑगस्टपर्यंत सुट्टी आहे. परेशला कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा पोलिस किंवा न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार असल्याने त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात उद्याच्या सुनावणीसाठी विनवणी केली. मात्र, या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याचे कारण नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने तोंडी नोंदवले.

मेघनाच्या अर्जाचीही प्रतीक्षा

अपघातावेळी मर्सिडीज कार परेश नव्हे तर त्याची पत्नी मेघना सावर्डेकर ही चालवत होती अशी भूमिका दिवाडीवासीयांनी घेऊन तिला अटक करण्याची मागणी केली. तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावरील सुनावणीवेळी काल न्यायालयाने तिला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.यावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sattari Gaur Attack: सत्तरीत गव्यांचा धुमाकूळ! काढणीला आलेले भाजीपिक काही क्षणांत उद्ध्वस्त; मैंगिणेतील शेतकरी महिलेचे मोठे नुकसान

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT