Banastarim Bridge Accident: बाणास्तरी अपघातातील जखमी वृद्धाने हात, पाय गमावला; काहींची प्रकृती चिंताजनक, कुटुंबीय हवालदिल

अपघातात मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबांवर काळाने घाला घातला
Banastarim Bridge Accident
Banastarim Bridge AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी येथील अपघातात मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबांवर काळाने घाला घातला आहे. मृत्यू झालेल्यांची कुटुंबे तर पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत, तर जखमींच्या कुटुंबीयांची परिस्थितीही फारशी चांगली नाही.

जखमींवर अजूनही उपचार सुरू असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बाणस्तारी येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात अनेक कुटुंबे उदध्वस्त झाली आहेत. अपघातात तीनजणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर तिघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहे.

यापैकी वनिता भंडारी (फोंडा) यांना श्वासोच्छवासाची समस्या उदभवल्याने त्यांना सुपर स्पेशालिटीच्या आयसीयूमध्ये स्थलांतरित केले आहे.

Banastarim Bridge Accident
CAG Of India: राज्यावर वाढला कर्जाचा डोंगर

वृद्धाने हात, पाय गमावला

शंकर हळर्णकर हे ज्येष्ठ नागरिक असून अपघातानंतर ते आपल्या चारचाकी वाहनातच अडकून पडले होते. त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा एक हात आणि पाय निष्क्रिय झाला आहे.

हळर्णकर यांच्या मणक्यावर न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पोनराज के. सुंदरम हे शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यानंतर हळर्णकरांना अतिदक्षता विभागात स्थलांतरित करण्यात येणार आहे.

Banastarim Bridge Accident
Vedanta Bicholim Mines: डिचोली खाण ब्लॉक प्रकरणी सरकार भूमिकेवर ठाम, जनतेत रोष; जनसुनावणी तापणार?

‘तो’ तरुण अजूनही धक्क्यातच

जखमींपैकी राज माजगावकर हा तरुण सुखरूप असून डोक्याला दुखापत झाल्याने त्याला १३८ क्रमांकाच्या विभागात ठेवले आहे.

त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यासोबत नातेवाईक आहेत; परंतु अपघाताच्या आघातातून तो अजूनही सावरलेला नाही.

जखमी महिलेची प्रकृती बिघडली

वनिता भंडारी या अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून सामान्य महिला ऑर्थोपेडिक विभागात ठेवले होते, परंतु श्वासोच्छवासाची समस्या निर्माण झाल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांना सुपर स्पेशालिटी विभागाच्या एमआयसीयूमध्ये हलवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com