Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident संबंधी महत्वाची माहिती; तपास आता म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे

गोमन्तक डिजिटल टीम

Banastarim Bridge Accident बाणस्तारी अपघात प्रकरणातील मर्सिडीस कारमालक मेघना सिनाय सावर्डेकर हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २३ ऑगस्टपर्यंत फोंडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुढे ढकलली.

पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन कायम असेल; तर कारचालक परेश सावर्डेकर याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

दरम्‍यान, तपासकामावर विश्‍वास नसल्याने हे प्रकरण म्हार्दोळ पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे देण्याची आम्ही केलेली मागणी वरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्य केली आहे, अशी माहिती कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली.

या अपघातावेळी तिचा पती संशयित परेश हा कारचालक नव्हता, तर मेघना ही कार चालवत होती, असे आरोप घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका कारचालकाने केल्याने व लोकांनीही तिची चौकशी करण्यासाठी जोर धरल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी पोलिस स्थानकात उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवले होते.

तिची वैद्यकीय चाचणी, जबानी तसेच हाताचे ठसे घेण्यासाठी उपस्थिती आवश्‍यक असल्याचे या समन्समध्ये नमूद केले होते. त्यामुळे हे समन्स मिळताच अटकपूर्व जामिनासाठी तिने फोंडा सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

न्यायालयाने तिला अंतरिम अटकपूर्व जामीन देऊन त्यावरील सुनावणी १६ रोजी ठेवली होती. दरम्यानच्या काळात पोलिसांनी तिला वारंवार समन्स बजावले. मात्र, खासगी इस्पितळात उपचार घेत असल्याने आपण उपस्थित राहू शकत नसल्याचे तिने कळविले होते.

परेशला १४ दिवस न्यायालयीन कोठडी

न्यायालयाने परेश याची कोलवाळ येथील कारागृहात रवानगी केली आहे. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. सुमारे ८ दिवस पोलिस कोठडीत राहिल्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

पोलिसांनी त्याच्या जामिनाला उच्च न्यायालयात विरोध दर्शविला आहे. तपासकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. काहीजणांच्या जबान्या नोंदवायच्या आहेत. संशयित राजकीयदृष्ट्या वजनदार व्यक्ती असल्याने साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली.

फळदेसाई यांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बाणस्तारी अपघातप्रकरणी पोलिसांच्या तपासकामात संभ्रम निर्माण होत आहे. या अपघाताला जबाबदार असलेल्या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून ते न्याय देत नाहीत. तपासकामावर विश्‍वास नसल्याने हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे देण्याची आम्ही केलेली मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्य केली आहे, अशी माहिती कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी दिली. फळदेसाई यांच्या नेतृत्वाखाली दिवाडी येथील लोकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना आज (बुधवारी) भेटले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CRZ चे उल्लंघन भोवले, हरमल बीच भागातील सात अवैध बांधकामांवर हातोडा; आठ बाकी

Bhutani Infra: भूतानी प्रकल्‍पावरुन सावंत सरकार अडचणीत, मालकी हक्‍क न तपासता परवाना दिल्‍याचा आरोप

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाराज, गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरल्यावरुन व्यक्त केली चिंता

Goa Today's News Live: गावच्या गणपती दर्शनासाठी गेला अन् चोरट्यांनी घरात डल्ला मारला; ४५ मिनिटांत ६ लाखांचा ऐवज लंपास

Sahara Refund Cap: सहारामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांना दिलासा, रिफंडबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT