Goa Accident | Goa Medical College Hospital Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: अनंत साळकर यांच्यावर 'गोमेकॉत' उपचार सुरुच

Goa Accident: ज्येष्ठ पत्रकार अनंत साळकर यांच्यावर बांबोळी येथील हॉस्पिटमध्ये दोन दिवसांपासून उपचार सुरु आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Accident: अपघातात गंभीर जखमी झालेले ज्येष्ठ पत्रकार अनंत साळकर यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू आहेत. मेंदूवर शस्त्रक्रिया करुन त्‍यांना अतिदक्षता विभागात आयसीयु (ICU) डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

दरम्‍यान, त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा दिसून येत असली तरी अजून धोका टळलेला नाही, असे मत गोमेकॉ हॉस्पिटल न्युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पुनराज यांनी त्यांची पाहणी केल्यावर व्यक्त केले.

शनिवारी 1 ऑक्टोबरला रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना चोडण येथे साळकर यांना अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्वरित त्यांना गोमेकॉ हॉस्पिटलात उपचारांसाठी दाखल केल्यानंतर रात्रीच त्यांच्या डोक्यावर सुमारे सात तास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांनी आज केलेल्या तपासणीत म्हणावी तेवढी सुधारणा दिसून आली नाही. उद्यापर्यंत 48 तासांनंतर त्यांच्यातील सुधारणेबाबत पुन्‍हा तपासणी केली जाईल. तज्ज्ञ डॉक्‍टर शेखर साळकर यांनीही त्यांच्या प्रकृतीची पाहणी केली. अपघाताचे वृत्त समजताच अनेकांनी हॉस्पिटलाधाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची नातेवाईकांकडे विचारपूस केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT