बजरंग दल गोवाचे (Goa) अध्यक्ष नितीन फळदेसाई Dainik Gomantak
गोवा

अन्याय फक्त हिंदूंवरच केला जातो: बजरंग दल

बंगलादेशात दुर्गापूजा मंडळांवर झालेल्या हल्ल्यात इस्कॉन सदस्याची हत्या हत्येचा गोवा बजरंग दलाने निषेध केला.

Dainik Gomantak

Goa: पश्चिम बंगाल‌ (W Bengal) येथे दुर्गापुजा (Durga-pooja) मंडपावर हल्ले करून‌ देशभर दहशत माजविण्याच्या कृतीचा निषेध असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय बजरंग दल (National Bajarang Dal, Goa) गोवाचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी केली (President Nitin Fal-Dessai).

बंगालात रोहींग्ये (Rohingya) आणि अन्य धर्मांध मंडळी आता डोईजड होत आहेत. बंगलादेशात (Bangladesh) सुद्धा दुर्गापूजा मंडळांवर हल्ला करताना काल एका इस्कॉन सदस्याचीही हत्या करण्यात आली. हा अन्याय फक्त हिंदूंवरच केला जात आहे. आपल्या देशातील सहीष्णूवादी आता बोलणार नाहीत. आता त्यांची तोंडे का बंद आहेत, असा सवाल नितीन फळदेसाई यांनी केला आहे.

गोव्यात निवडणूक तोंडावर आली आहे. तृणमूल कॉंग्रेस या बंगाली पक्षानेही यावेळी निवडणुकीत आपली कंबर कसली आहे. प्रचारासाठी पश्चिम बंगाल‌ येथून म्हणे दहा हजार लोक गोव्यात येणार आहेत. या दहा हजारात कोण असतील याची कल्पना मंत्री माविन गुदिनो यानी परवा घर घर चलो अभियानात मुरगांव येथे दिली आहे. रोहींग्या बांगलादेशी यांना गोव्यात थारा देता कामा नये, या क्षणाला 80,000 रोहींग्या लोक गोव्यात आहे, हे लोक एकदा गोव्यात घुसले तर जाण्याचे नाव घेणार नाहीत. गोवा सरकारने याची दखल घ्यायलाच हवी. अन्यथा ते गोमंतकीय जनतेला जड जाईल.

निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यात दाखल होणाऱ्या सर्व परप्रांतीय लोकांवर आधीच कडक नजर ठेवली गेली पाहीजे, त्यांची ओळखपत्रांची खात्री पटली तर त्यांना फक्त पंधरा दिवसच गोव्यात वास्तव्य करण्याची परवानगी देण्यात यावी. त्यांची वेळ संपली की सगळे गोव्यातून बाहेर पडतील, यांची खात्रीही सरकारने घ्यायला हवी, असे नितीन फळदेसाई म्हणाले.

गोमंतकीय जनतेने याकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, आपल्या आजूबाजूला कोणी अनोळखी व्यक्ती दिसत असल्यास किंवा काही संशयास्पद आढळल्यास सतर्क होउन जवळच्या पोलिस स्थानकात संपर्क साधण्याचे आवाहन नितीन फळदेसाई यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT