शिवोली: 2017 च्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2017) गोमंतकीय जनतेने कॉंग्रेसच्या (Congress) बाजूने कौल दिलेला असतानाही तत्कालीन राज्यपाल म्रुद्रूला सिन्हा (Former Governor Mridula Sinha) यांच्या असहकारामुळेच कॉंग्रेस सत्तेपासून दुर राहिल्याचा स्पष्ट आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (GPCC President Girish Chodankar) यांनी शिवोलीत (Siolim Constituency) केला. सामाजिक कार्यकर्ते तथा शिवोली कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर यांच्या मार्ना शिवोलीतील कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन केल्यानंतर अध्यक्ष चोडणकर बोलत होते. यावेळी शिवोली गटाध्यक्ष पार्वती नागवेंकर, प्रभारी बाबी बागकर, माजी आमदार तथा मंत्री अड. चंद्रकांत चोडणकर, तुलियो डिसोझा, चंदन मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गोव्याला नुकतीच भेट देऊन गेलेल्या माजी केंद्रीय वित्तमंत्री तसेच कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते पी. चिदंबरम यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक मतदार संघात कॉंग्रेस कार्यालये स्थापन होणे आवश्यक असून त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना दैनंदिन पक्ष कार्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम पेडणेकर यांनी या गोष्टीची दखल घेत शिवोलीत स्वतंत्र कार्यालय सुरु केल्याबद्दल चोडणकर यांनी त्यांचे कौतुक केले. माजी आमदार तथा मंत्री चंद्रकांत चोडणकर यांनी कॉग्रेस पक्षाचा देशाच्या विकास आणी प्रगतीत महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले.
गोवा स्वातंत्र्य चळवळीपासून ते राज्याला घटक राज्याचा दर्जा देण्याचे श्रेय केवळ कॉंग्रेसलाच जात असल्याचे सांगितले. दरम्यान, यंदा शिवोलीत कॉंग्रेस पक्ष इतिहास घडविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बाबी बागकर, तुलियो डिसोझा तसेच दत्ताराम पेडणेकर यांची समयोचित भाषणे झाली. स्वागत गटाध्यक्ष पार्वती नागवेंकर यांनी केले . सुरुवातीला स्थानिक सेंट एन्थॉनी चर्चच्या धर्मगुरुंनी प्रार्थना केली व कार्यालयाला सदिच्छा दिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.