हॉस्पिटलच्या मल्टी टास्किंग स्टाफला कायम करण्याची गरज: मंत्री माविन गुदीनो

चिखली उपजिल्हा रुग्णालयातील मल्टी टास्किंग स्टाफला स्वतःच्या खिशातून वेतन दे असल्याचा दावा.
चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटनावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो सोबत इतर
चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटनावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो सोबत इतर दैनिक गोमन्तक
Published on
Updated on

Goa: चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये (Chikalim Sub District Hospital) प्रधानमंत्री निधीतून (PM Fund) उभारण्यात आलेल्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो (Transport Minister Mauvin Godinho) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी काही समस्यांवर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले की, या इस्पितळातील काही मल्टी टास्किंग स्टाफला मी माझ्या खिशातून आतापर्यंत वेतन देत आहे. त्या स्टाफला नोकरीत कायम करण्याची गरज आहे. ते काम सोडून गेल्यास पुन्हा समस्या निर्माण होतील. या इस्पितळासाठी ऑपरेशन थिएटरची गरज आहे. त्यासाठी लागणारे उपकरणे मी समाजातील काहीजणांकडून आणू शकतो. परंतु, ऑपरेशन थिएटरसाठी लागणारे डॉक्टर, सर्जन, भूलतज्ज्ञ डॉक्टर आदींची भरती लवकर होण्याची गरज आहे. त्यासाठी माझा प्रयत्नअसल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटनावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो सोबत इतर
राज्यपालांच्या असहकारामुळे 2017 मध्ये कॉंग्रेस सत्तेपासून वंचित

वाहतूक विभागांमध्ये येणाऱ्यांची कामे करण्यासाठी पूर्वी एजंट होते. मात्र, यापुढे ते दिसणार नाही. त्याऐवजी गाव पातळीवरील उद्योजक तयार केले आहेत. त्यांना मान्यता देण्यात आली असून ते संबंधितांचे फॉर्म भरून देण्यासाठी प्रति व्यक्ती शंभर रुपयेघेतील. अशा पध्दतीने संपूर्ण गोव्यात 1500 जणांची सेवा मिळणार आहे. त्यामुळे त्यांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटनावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो सोबत इतर
गोव्यात तृणमूलच्या उपस्थितीमुळे भाजप घाबरले: ओ ब्रायन

गोव्यात कोठेही अपघात झाल्यावर त्यांची माहिती सर्व सरकारी संबंधित विभागांना लगेच उपलब्ध होईल. सदर अपघात कसा. कोठे.कोणत्या वाहनांमध्ये झाला, वाहन किती जुने होते यासंबंधी सर्व छायाचित्रे लगेच उपलब्ध होतील. अपघात झाला त्या रस्त्याच्या स्थितीसंबंधीही माहिती मिळेल. वळणामुळे किंवा इतर कारणास्तव अपघात होत असेल तर सर्व माहिती संबंधित खात्यांकडे जाईल, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com