Girish Chodankar Dainik Gomantak
गोवा

Goa News: बहुजनांना आरक्षण द्या, अन्‍यथा आंदोलनाचा इशारा!

दैनिक गोमन्तक

Goa News: गोवा वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयात एकूण 60 जागा रिक्त आहेत. त्यात ओबीसींसाठी 16, अनुसूचित जमातींसाठी 7 आणि अनुसूचित जातींसाठी 1जागा राखीव आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या तिन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांपासून भाजप सरकारने वंचित ठेवले आहे.

राज्य सरकार बहुजनविरोधी आहे. आरक्षणाचा हक्क वरील वर्गांतील विद्यार्थ्यांना न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चोडणकर यांनी म्हटले आहे की, वैद्यकीय महाविद्यालयांत विविध शाखांमध्ये आरक्षण देण्याचा न्यायालयाचा आदेश आहे.

तरी देखील सरकार (Government) त्याची अंमलबजावणी करीत नाही. या आरक्षणाची फाईल कायदा विभागात प्रलंबित आहे. ती तातडीने मंजूर करून व नियम दुरुस्ती करून मंत्रिमंडळात ते आरक्षण मान्य करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पण तसे न केल्‍यामुळेच पहिल्या फेरीत इच्छुक ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला नाही. निदान दुसऱ्या फेरीत तरी हे विद्यार्थी न्यायापासून वंचित राहता कामा नयेत.

वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणे सर्वसामान्‍य माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्‍हणूनच बहुजन समजाची मुले गोमेकॉतील आरक्षणाकडे डोळे लावून बसलेली आहेत. सकारमधील बहुजन समाजाचे नेते रवी नाईक, सुभाष शिरोडकर, नीळकंठ हळर्णकर व गोविंद गावडे यांनी तरी आता सरकारचे डोळे उघडावे, असे चोडणकर यांनी म्‍हटले आहे.

गिरीश चोडणकर, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्‍यक्ष-

काँग्रेसमधील आमदारांना फोडून भाजपमधील बहुजन समाजातील अनेक नेत्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडून सुरू आहे. कोणत्याही खात्यातील नोकऱ्या असल्या तरी शेवटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे जाते आणि तेथे ओबीसींना कसे वगळता येईल याचा प्रयत्न होतो असे त्यांच्याच पक्षातील लोक सध्‍या बोलत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT