National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

National Games 2023: गोव्याकडून सुवर्णांची लयलूट; बॉक्सिंग, यॉटिंग, स्क्वे मार्शल आर्टसमध्ये यश

दोना पावला येथील हवाई बीचवर यॉटिंग स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खराब हवामानामुळे एकही शर्यत झाली नाही.

किशोर पेटकर

National Games Goa 2023: गोव्यात बुधवारी पहाटे भरपूर पाऊस झाला, त्यामुळे 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अंतिमपूर्व दिनी होणाऱ्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले, नंतर वातावरण बदलले. यॉटिंग शर्यतीत खराब हवामानामुळे रद्द कराव्या लागल्या, तरी आकाश स्वच्छ झाल्यानंतर हॉकी, बीच हँडबॉल आदी आऊटडोअर स्पर्धेतील अंतिम सामने झाले.

या पार्श्वभूमीवर यजमान गोव्याने बॉक्सिंग, यॉटिंग, स्क्वे मार्शल आर्ट या खेळात सुवर्णपदकांची लयलूट केली.

पेडे-म्हापसा येथील इनडोअर स्टेडिममध्ये गोव्याने बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन ब्राँझ अशी एकूण नऊ पदके प्राप्त केली. महिलांत साक्षी चौधरी, पुरुषांत रजत, गौरव चौहान सुवर्णपदकांचे मानकरी ठरले.

महिलांत सनामाचा चानू, पुरुषांत आकाश गुरखा, लोकेश याने अंतिम लढत गमवावी लागली, त्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रोशन जमीर, आयुष साई, निहारिका यांना ब्राँझपदके प्राप्त झाली.

दोना पावला येथील हवाई बीचवर यॉटिंग स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी खराब हवामानामुळे एकही शर्यत झाली नाही. मात्र मंगळवारपर्यंतच्या एकंदरीत कामगिरीच्या आधारे आयक्यू फॉईलमध्ये कात्या व डेन या कुएल्हो भावंडांनी प्रत्येकी एक सुवर्ण जिंकले. अद्वैत मेनन याला रौप्य, तर पर्ल कोलवाळकरला ब्राँझपदक मिळाले.

फातोर्डा येथे स्क्वे मार्शल आर्टमध्ये गोव्याने पहिल्या सत्रात सहा सुवर्ण, सहा रौप्य व दोन ब्राँझ मिळून 14 पदके जिंकली. या खेळात गोव्याला आणखी पदके मिळणार आहेत. एकंदरीत, बुधवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत गोव्याने 23 सुवर्ण, 22 रौप्य व 33 ब्राँझ मिळून एकूण 78 पदके जिंकली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT